ADVERTISEMENT

सावळ्याची जणू सावली मालिकेत मोठा ट्विस्ट; सावलीच्या मदतीला पुन्हा येणार ‘बाबा’ जगन्नाथ

savalyachi janu savali serial new twist jagannath returns : "सावळ्याची जणू सावली" या लोकप्रिय मालिकेत सध्या कथानकाने नवे वळण घेतले असून सावली, सारंग आणि त्यांच्या मुलांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
savalyachi janu savali serial new twist jagannath returns

savalyachi janu savali serial new twist jagannath returns : “सावळ्याची जणू सावली” या मालिकेत सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे नाट्य रंगत आहे. कथानकात अचानक आलेल्या वळणामुळे सावली आणि सारंग यांच्या आयुष्यातील संघर्ष अधिक गडद होताना दिसत आहे. गैरसमज, कारस्थानं आणि भावनिक ताणतणाव यामुळे दोघांमध्ये मोठा दुरावा निर्माण झाला आहे. तिलोत्तमा, राजकुमार आणि भैरवी यांच्या डावपेचांमुळे या नात्यातील विश्वास ढासळला आणि दोघे वेगळे झाले.

दरम्यान, सावलीने जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर कथेला आणखी नाट्यमय वळण मिळाले. राजकुमारने सावली आणि तिच्या बाळांचा अंत करण्यासाठी गुंड पाठवले, मात्र सावलीने धैर्याने त्यांचा सामना केला. या संघर्षात एक बाळ गुंडांच्या हाती लागले, पण शेवटच्या क्षणी सारंग तिथे पोहोचला आणि त्याने त्या बाळाचे प्राण वाचवले. विशेष म्हणजे, त्या बाळाशी त्याचा रक्ताचा संबंध आहे, याची त्याला अजिबात कल्पना नाही. तरीही त्याने त्या मुलीला स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे, सावली तिच्या दुसऱ्या मुलासह मेहेंदळे कुटुंबापासून दूर राहत आहे. मालिकेत सध्या दाखवण्यात आलेल्या प्रसंगांनुसार, सारंग आणि अबीरची भेट झाली आहे, तसेच सावली आणि तिची मुलगी ओवी यांचीही गाठ पडली आहे. आता पुढे सावली आणि सारंग पुन्हा एकत्र येणार का, याची उत्सुकता वाढत चालली आहे.

हे पण वाचा.. अवघ्या ७ महिन्यांत ‘नशीबवान’ Off Air; अंतिम भागात खलनायकाचा थरारक अंत!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये एक नवा धक्का देणारा प्रसंग समोर आला आहे. अबीर खेळत असताना अचानक एक भरधाव कार येते आणि त्याच्यावर धडकण्याची वेळ येते. यावेळी राजकुमारचा प्रवेश होतो आणि तो अबीरवर राग काढतो. मात्र, आसपासच्या लोकांच्या दबावामुळे त्याला माफी मागावी लागते. या घटनेनंतर सावली अबीरला घेऊन घाबरलेल्या अवस्थेत पळत असते.

याच वेळी एक कार तिच्यासमोर थांबते आणि त्यातून एक ओळखीचा चेहरा बाहेर येतो. सुरुवातीला सावलीच्या चेहऱ्यावर भीती दिसते, पण त्या व्यक्तीला पाहताच तिच्या डोळ्यांत आनंद झळकतो. तो म्हणजे तिचा ‘बाबा’ जगन्नाथ. त्याच्या डोळ्यांतही अश्रू दिसतात आणि त्याचा बदललेला लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. हातात काठी असलेला जगन्नाथ आता सावलीच्या मदतीला उभा ठाकणार असल्याचे स्पष्ट होते.

हे पण वाचा.. राखी सावंतच्या वक्तव्यांवर दिपाली सय्यदचा संताप; ‘संसार टिकवणं सोपं नाही’

savalyachi janu savali serial new twist jagannath returns

या घडामोडींमुळे मालिकेत पुढे काय होणार, राजकुमारचे कारस्थान यशस्वी होणार की सावलीचे सत्य समोर येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कथानकातील या नव्या टप्प्यामुळे “सावळ्याची जणू सावली” ही मालिका अधिकच रंगतदार बनली आहे.