paaru serial suddenly ended : पारू ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका अचानक गायब झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या वाहिनीवरील अनेक मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असताना, Paaru विषयी समोर आलेली ही अपडेट अनेकांसाठी धक्कादायक ठरली आहे. विशेष म्हणजे, मालिकेचा शेवट झाला असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप Zee Marathi कडून करण्यात आलेली नाही.
१० फेब्रुवारीनंतर Paaru चा एकही नवीन भाग टीव्हीवर प्रसारित झालेला नाही. इतकंच नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वरही या तारखेनंतरचे भाग उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही मालिका अचानक ऑफ एअर झाली असावी, अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. सुरुवातीला काही दिवस तांत्रिक कारणामुळे भाग उपलब्ध नसावेत, असं वाटलं; पण जसजसे दिवस गेले, तसतसं प्रेक्षकांचा संशय अधिकच बळावत गेला.
Paaru मालिका १२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. साध्या कथानकातून भावनिक नातेसंबंध मांडणाऱ्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. जवळपास दोन वर्षे ही मालिका नियमितपणे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचत होती. विशेष म्हणजे, रात्री ११ वाजताच्या उशिराच्या स्लॉटमध्ये असूनही Paaru ला समाधानकारक टीआरपी मिळत होता. त्यामुळे अचानक हा प्रवास थांबला कसा, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
या सगळ्या चर्चांमध्ये मालिकेतील पारूची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे हिच्या सोशल मीडिया हालचालींनी लक्ष वेधून घेतलं आहे. तिनं काही फॅनपेजेसवरील पोस्ट्स रिशेअर केल्या आहेत. या पोस्ट्समध्ये “आता पारू पुन्हा दिसणार नाही, मन खूप भरून आलंय” किंवा “ही भूमिका कायम लक्षात राहील” अशा भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. शरयूने या पोस्ट्स शेअर केल्यामुळे Paaru चा शेवट झाल्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे, कोणताही अंतिम भागाचा प्रोमो, कलाकारांचा निरोपाचा व्हिडीओ किंवा सेटवरील शेवटच्या दिवसाचं सेलिब्रेशन—असं काहीच समोर आलेलं नाही. साधारणपणे लोकप्रिय मालिकांच्या समाप्तीवेळी प्रेक्षकांसाठी खास प्रोमो किंवा भावनिक पोस्ट शेअर केल्या जातात. मात्र Paaru च्या बाबतीत असं काहीही न झाल्यामुळे संभ्रम वाढत आहे.
हे पण वाचा.. वहिनीच्या अंत्यसंस्कारानंतर थेट शूटला गेलो…हार्दिक जोशी याने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ
९ आणि १० फेब्रुवारीला मालिकेचे दोन भाग प्रसारित झाले आणि १० फेब्रुवारीचा भागच शेवटचा ठरल्याचं आता बोललं जात आहे. अधिकृत स्पष्टीकरण नसल्याने प्रेक्षक अजूनही उत्तरांच्या प्रतीक्षेत आहेत. Paaru अचानक का संपली, हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर सातत्यानं विचारला जात असून, झी मराठीकडून येणाऱ्या स्पष्टतेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
हे पण वाचा.. लाखात एक आमचा दादा’नंतर नितीश चव्हाण पुन्हा चर्चेत; भक्तीमय गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला
paaru serial suddenly ended

पारू मालिका अचानक संपली








