suraj chavan honanarya patnich nav dhananjay powar comment : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सूरज चव्हाण गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या चर्चेमुळे सतत चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असलेला सूरज आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. त्यामुळे त्याचा फॅन फॉलोइंगही दिवसेंदिवस वाढताना दिसतो.
अलिकडेच अभिनेत्री अंकिता वालावलकरने सूरजच्या गावी भेट दिली होती. त्या वेळी तिने सूरजसोबत एक खास फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याच्या शेजारी एक मुलगी दिसत होती. मात्र त्या मुलीचा चेहरा झाकल्यामुळे तीच सूरजची होणारी पत्नी आहे का, याबाबत नेटकरी प्रचंड उत्सुक झाले. तेव्हापासून सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल आणि होणाऱ्या पत्नीबद्दल सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.
याच पार्श्वभूमीवर सूरजने नुकताच एक मजेशीर व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला. दक्षिण भारतीय अंदाजातील त्या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत एक सुंदर मुलगी दिसत होती. व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये सूरजने स्पष्ट केलं की हा फक्त ‘टाईमपास’ व्हिडीओ आहे आणि खरी होणारी पत्नी तो लवकरच दाखवणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता अजून वाढली आहे.
या व्हिडीओखाली धनंजय पोवारने केलेली मजेशीर कमेंट मात्र चर्चेचा विषय ठरली. त्याने लिहिलं, “मला माहिती आहे, मी पाहिलं आहे. आता तुझ्या छकुलीचा फोटो मीच टाकतो”. यावरून सूरजच्या होणाऱ्या पत्नीचं नाव ‘छकुली’ असल्याची चर्चा रंगली. अर्थातच ही कमेंट मजेत केली असली तरी चाहत्यांनी या नावाला वेगळ्याच अर्थाने घेतलं आहे.
दरम्यान, सूरज चव्हाणच्या या पोस्टवर गायक अभिजीत सावंतपासून छोटा पुढारीपर्यंत अनेकांनी शुभेच्छा दिल्या. अभिजीतने “सूरज तुला खूप खूप शुभेच्छा” असं म्हटलं, तर छोटा पुढारीने “शेवटी सूरज भाऊनी आम्हाला एक वहिनी आणली” अशी मजेशीर कमेंट केली.
सध्या सूरज चव्हाणने आपल्या लग्नाची नेमकी तारीख जाहीर केलेली नसली, तरी तो लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. त्याच्या नव्या घराचं काम अंतिम टप्प्यात असल्याचंही बोललं जात आहे.
हे पण वाचा.. नांदेडच्या शेतकऱ्यांने कोण बनेगा करोडपती मध्ये जिंकले 50 लाख रुपये Kaun Banega Crorepati Farmer Won 50 Lakh
सूरज चव्हाणच्या होणाऱ्या पत्नीचं खरं नाव आणि तिचा चेहरा अद्याप अधिकृतपणे समोर आला नाही. मात्र धनंजय पोवारच्या एका हलक्याफुलक्या कमेंटमुळे ही गोष्ट चर्चेत आली असून, चाहत्यांना आता सूरजच्या लग्नसोहळ्याची उत्सुकतेने प्रतीक्षा आहे.
हे पण वाचा.. “लग्नानंतर होईलच प्रेम: काव्याची ‘मी त्यांची बायको…’ कबुली, मानिनी काकूंच्या हट्टाने नेटकरी संतापले!”
suraj chavan honanarya patnich nav dhananjay powar comment










