ADVERTISEMENT

आनंदाचा क्षण! इश्कबाज फेम अदिती गुप्ता हिने दिला जुळ्या लेकींना जन्म लग्नानंतर सात वर्षांनी घरात दुमदुमला किलबिलाट

additi gupta sat varshanni jalya mulina janma : ‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री Additi Gupta हिने सात वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. ३७ वर्षीय अदितीने ही गोड बातमी दोन महिन्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली असून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
additi gupta sat varshanni jalya mulina janma

additi gupta sat varshanni jalya mulina janma : दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री Additi Gupta आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. लग्नानंतर सात वर्षांनी ती आई बनली असून तिने नुकत्याच जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी अदितीने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली.

३७ वर्षांच्या अदितीने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत दोन महिन्यांनंतर हा आनंद व्यक्त केला. तिने लिहिलं, “Nervous, Excited & Emotional !! अखेर आमचं छोटं सिक्रेट जगाबरोबर शेअर करत आहोत.” या कॅप्शनमधून तिच्या भावना स्पष्टपणे जाणवत होत्या. चाहत्यांनी व सेलिब्रिटी मित्रांनी तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अदिती गुप्ता आणि तिचा पती कबीर चोप्रा यांनी २०१८ मध्ये विवाह केला होता. ऑक्टोबरमध्ये साखरपुडा करून त्यांनी डिसेंबर महिन्यात खासगी समारंभात लग्नगाठ बांधली होती. सात वर्षांनंतर अखेर दोघांच्या आयुष्यात ही मोठी खूशखबर आली आहे.

अदितीच्या या गोड बातमीवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करून अभिनंदन केले. अभिनेत्री कृतिका कामरा, मृणाल देशराज, किश्वर मर्चंट, द्रष्टी धामी, अनिता हसनंदानी, सेहबान अझीम, गौतम रोडे, आमिर अली, रोहित पुरोहित, अनिरुद्ध दवे यांच्यासह अनेकांनी तिचं कौतुक केलं व आई-बाबा बनलेल्या या जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

अभिनेत्रीच्या कारकिर्दीकडे पाहिल्यास, अदिती गुप्ताला पहिलं मोठं यश मिळालं ते ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेतून. तिच्या अभिनयाने तिला वेगळं ओळख मिळाली. त्यानंतर धडकन जिंदगी की, कबूल है, इश्कबाज अशा मालिकांमधूनही तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दूरदर्शन व्यतिरिक्त, अदितीने IC814 या सीरिजमध्येही काम करून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती.

हे पण वाचा.. Bigg Boss 19 मध्ये फक्त ड्रामा नाही, शिक्षणातही भारी! कुनिका सदानंद पासून प्रणित मोरेपर्यंत जाणून घ्या कोण किती शिकलेलं

आज तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण तिने चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. आई बनण्याचा आनंद आणि त्या भावनांचा उत्सव सध्या सोशल मीडियावर झळकत आहे. सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला हा आनंद अदिती गुप्ता व कबीर चोप्रा यांच्या जीवनात नवा अध्याय घेऊन आला आहे.

हे पण वाचा..“सूरज चव्हाण लग्नाच्या चर्चेत, धनंजय पोवारने होणाऱ्या वहिनीचं नाव सांगितलं?”

additi gupta sat varshanni jalya mulina janma