ADVERTISEMENT

हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील बाळजाबाईच्या मुली एक मॉडेल तर दुसरी गुगलमध्ये कामाला Halad Rusli Kunku Hasla

'हळद रुसली कुंकू हसलं' (Halad Rusli Kunku Hasla) मालिकेत बाळजाबाईची भूमिका करणाऱ्या पूजा पवार-साळुंखे यांच्या मुलींपैकी एक मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे तर दुसरी थेट गुगलमध्ये काम करते.
Halad Rusli Kunku Hasla

स्टार प्रवाहवरील ‘हळद रुसली कुंकू हसलं’ (Halad Rusli Kunku Hasla) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून त्यातील बाळजाबाई ही व्यक्तिरेखा विशेष गाजत आहे. अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे यांनी साकारलेली ही भूमिका त्यांना पुन्हा एकदा चर्चेत आणते आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेनंतर तब्बल तीन वर्षांनी त्या पुन्हा छोट्या पडद्यावर झळकत असून त्यांच्या दमदार अभिनयामुळे मालिकेला अधिक रंगत आली आहे.

पूजा पवार-साळुंखे यांनी आजवर मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकाविश्वात भक्कम ठसा उमटवला आहे. झपाटलेला, एक होता विदुषक अशा गाजलेल्या चित्रपटांपासून ते लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, अजिंक्य देव यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं आहे. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासामुळे त्यांना मोठं नाव आणि लोकप्रियता मिळाली आहे.

पण यावेळी प्रेक्षकांचं लक्ष फक्त त्यांच्या भूमिकेकडेच नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही केंद्रीत झालं आहे. विशेष म्हणजे, पूजा पवार-साळुंखे यांच्या दोन्ही मुली देखील प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

त्यांच्या मुलींची नावं आहेत — अतिशा आणि नताशा. दोघीही आईप्रमाणेच सुंदर दिसतात. यातील एक मुलगी म्हणजे अतिशा मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत आहे. तिच्या फोटोंमुळे आणि रॅम्पवॉकमुळे ती चर्चेत आहे. दुसरी लेक नताशा मात्र पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात करिअर घडवत असून ती सध्या जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या Google मध्ये कार्यरत आहे.

पूजा पवार आपल्या दोन्ही मुलींच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांचा सततचा पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळेच अतिशा आणि नताशा आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे कामगिरी करताना दिसत आहेत.

प्रिया मराठेच्या आठवणीत मृणाल दुसानीस भावुक; म्हणाली – Mrunal Dusanis on Priya Marathe

‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेतून प्रेक्षकांशी नातं जुळवणाऱ्या बाळजाबाईची अभिनेत्री पूजाच्या वैयक्तिक आयुष्याची ही गोष्ट ऐकून चाहत्यांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या मुलींच्या या यशस्वी प्रवासामुळे चाहत्यांमध्ये कौतुकाची भावना अधिकच वाढली आहे.