Yuzvendra Chahal RJ Mahvash प्रेम, क्रिकेट आणि चर्चांचा संगम! युजवेंद्र चहलच्या वैयक्तिक आयुष्यात नवा वळण – आरजे महवशसोबत शेअर केलेला फोटो आणि तिची भावनिक पोस्ट चर्चांना नवा रंग देत आहे.
Table of Contents
Yuzvendra Chahal RJ Mahvash :-भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या मैदानातील कामगिरीपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे अधिक चर्चेत आहे. नुकताच त्याचा पत्नी धनश्री वर्मा हिच्याशी घटस्फोट झाला असून, आता त्याचं नाव आरजे महवशसोबत जोडलं जात आहे. या पार्श्वभूमीवर चहलने आपल्या इन्स्टाग्रामवर महवशसोबतचा एक सेल्फी पोस्ट करत चर्चांना नवा उजाळा दिला आहे.
चहल सध्या IPL 2025 मध्ये पंजाब किंग्स संघाकडून खेळत असून, त्याला या हंगामात तब्बल १८ कोटींना संघात घेण्यात आले आहे. ८ एप्रिल रोजी पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात चहलला एका षटकाची संधी मिळाली होती, ज्यामध्ये त्याने यश ठाकूरच्या गोलंदाजीवर धोनीचा झेल टिपला. मात्र, या सामन्याच्या दरम्यान चहलपेक्षा जास्त चर्चेत होती आरजे महवश.
Yuzvendra Chahal RJ Mahvash post
महवश या सामन्यात पंजाब संघाला जोरदार पाठिंबा देताना दिसली. ती चहलसाठी स्टँडमधून चिअर करत होती. विशेष म्हणजे, सामन्यानंतर तिने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली. त्या पोस्टमध्ये तिने चहलला टॅग करत लिहिलं, “आपल्या माणसांच्या प्रत्येक कठीण काळात मी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहते. आम्ही तुझ्यासोबत आहोत.”
या पोस्टवर चहलनेही प्रतिसाद दिला असून, तो म्हणाला, “तुम्ही सर्व माझी सर्वात मोठी ताकद आहात.” त्यामुळे त्यांच्या नात्याबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. काही चाहत्यांनी थेट विचारलं – “हे अधिकृत झालंय का?”
याआधी देखील चहल आणि महवशला एकत्र वेळ घालवताना अनेकदा पाहण्यात आलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यानही दोघे स्टँडमध्ये एकत्र बसलेले दिसले होते. त्यामुळे त्यांच्या मैत्रीबाबत तर्कवितर्क सुरू झाले होते, जे आता पुन्हा चर्चेत आले आहेत.
आरजे महवश सोशल मीडियावर सक्रिय असून, तिच्या प्रत्येक पोस्टमधून ती चहलच्या बाजूने उभी असल्याचं चित्र उमटत आहे. दुसरीकडे चहलनेही तिच्यासोबतचा फोटो शेअर करून संकेत दिल्यासारखं वाटत आहे. क्रिकेट मैदानातील त्याच्या खेळाइतकीच आता त्याच्या नात्याची गोष्टही चर्चेचा विषय बनली आहे.
विशेष म्हणजे, सीएसकेविरुद्धच्या सामन्यात जेव्हा ग्लेन मॅक्सवेलने रचिन रवींद्रला बाद केलं, तेव्हा महवशचा आनंदी चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला आणि तिची ती प्रतिक्रिया सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली. यावरून ती केवळ उपस्थित नसून भावनिक गुंतवणूकही करत असल्याचं स्पष्ट होतं.
सध्या चहलच्या व्यक्तिगत आयुष्यात जे चाललं आहे, त्याबाबत अधिकृत कोणतंही वक्तव्य त्याच्याकडून आलेलं नसले तरी, त्याच्या आणि महवशच्या सोशल मीडियावरील हालचाली चाहत्यांना नक्कीच काहीतरी सांगून जात आहेत. हे नातं केवळ मैत्रीचं आहे की अधिक काही, हे वेळच सांगेल. पण सध्या तरी, युझवेंद्र चहलच्या प्रेमकथेचा हा नवीन अध्याय प्रत्येक क्रिकेटप्रेमीचं लक्ष वेधून घेत आहे.
हे पण वाचा..realme narzo 80 pro आणि Narzo 80x 5G realme ने भारतात लाँच केली बजेट स्मार्टफोन्सची नवी मालिका.!