भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा यांच्यातील वैवाहिक संबंध अखेर संपण्याच्या मार्गावर आहेत. दोघेही तब्बल अडीच वर्षांपासून वेगळं राहत असून, आता IPL 2025पूर्वीच Yuzvendra Chahal Dhanashree Divorce चा निर्णय घेण्यात येणार आहे. या प्रकरणात अॅलिमनीच्या रकमेमुळे विशेष रंगली आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी, प्रसिद्ध डान्सर व कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचं नातं गेल्या काही काळापासून वादात सापडलं आहे. आता त्यांच्या वैवाहिक आयुष्याला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, IPL 2025 सुरू होण्याच्या आधीच म्हणजेच 20 मार्च रोजी Yuzvendra Chahal Dhanashree Divorce ची अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाला सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
चहल आणि धनश्री यांच्यातील वादाला आता सुमारे अडीच वर्षे झाली आहेत. या काळात ते वेगवेगळे राहत होते. दोघांनीही कोर्टाकडे सहमतीच्या घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13B नुसार, घटस्फोट घेण्यापूर्वी सहा महिन्यांचा ‘कूलिंग ऑफ’ कालावधी ठेवला जातो. मात्र, या कालावधीसाठी दोघांनीही माफी मागितली असून, आपल्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, युजवेंद्र चहल याने धनश्रीला कायमस्वरूपी अॅलिमनी म्हणून 4 कोटी 75 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. यापैकी 2 कोटी 37 लाख रुपये आधीच देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम तो आपल्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर अदा करणार असल्याचे कोर्टात स्पष्ट झाले आहे. याच मुद्द्यावर आधी कौटुंबिक न्यायालयाने 20 फेब्रुवारी रोजी त्यांच्या अर्जाला स्थगिती दिली होती. मात्र, चहलचे IPLमध्ये सहभाग लक्षात घेता, आता ही सुनावणी जलद करण्यात येणार आहे.
हे पण वाचा..dhanashree ने चहलसोबतचे फोटो पुन्हा शेअर केले; RJ Mahvash सोबतच्या चर्चांदरम्यान पोस्ट
दरम्यान, चहल याला पंजाब किंग्स संघाने IPL 2025 साठी 18 कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या संघात घेतले आहे. त्यामुळे त्याचा वेळ IPL स्पर्धेसाठी लागणार असून, न्यायालयाने त्याचं हे वेळापत्रक लक्षात घेऊन Yuzvendra Chahal Dhanashree Divorce सुनावणी तातडीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण प्रकरणात आणखी एक वळण म्हणजे, काही दिवसांपूर्वी चहल आणि RJ महविश यांचं नाव जोडलं जात होतं. चहलला भारत-न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल दरम्यान महविशसोबत पाहिलं गेलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगल्या होत्या की चहलच्या वैयक्तिक आयुष्यात नवीन नातं सुरू झालं आहे का? मात्र, यासंबंधी दोघांपैकी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
याच काळात, सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली होती की, चहलने धनश्रीला 60 कोटी रुपयांची अॅलिमनी देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, हे वृत्त पूर्णपणे निराधार असून, धनश्रीने स्वतः या अफवांना उत्तर दिलं होतं. “अशा प्रकारच्या निराधार अफवा आमच्या दोघांच्या कुटुंबावर परिणाम करत आहेत. आम्ही अशा कोणत्याही अॅलिमनीची मागणी केली नाही, ना चहलने तशी काही ऑफर दिली आहे,” असं तिनं स्पष्ट केलं.
चहल आणि धनश्रीच्या नात्याचा प्रवास 2020 मध्ये सुरू झाला होता. चहलने सोशल मीडियावर धनश्रीचे डान्स व्हिडिओ पाहून तिला डान्स शिकवण्याची विनंती केली होती. त्यानंतर दोघांमध्ये ओळख वाढली आणि त्यांनी लगेचच एंगेजमेंटची घोषणा केली होती. डिसेंबर 2020 मध्ये त्यांच्या लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. मात्र, जून 2022 पासून त्यांच्यात मतभेद वाढत गेले आणि दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. अखेर, 2025 च्या सुरुवातीला त्यांनी घटस्फोटासाठी अधिकृतपणे अर्ज दाखल केला.
आता दोघांमध्ये अॅलिमनीसंदर्भातील सर्व गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली तर, IPLपूर्वीच चहल आणि धनश्रीचा वैवाहिक प्रवास संपुष्टात येईल.