भारतात Vivo कंपनीने नवीन स्मार्टफोन Vivo V50 लॉन्च केला आहे हा फोन अत्याधुनिक AI फिचर्स आणि दमदार बॅटरी सह बाजारात सादर करण्यात आला आहे जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत!
Table of Contents
भारतीय बाजारात Vivo ने आज नवीन स्मार्टफोन Vivo V50 लॉन्च केला आहे. Vivo V40 हा फोन चा अपग्रेडेड व्हर्जन असून आणि अनेक फिचर्स मध्ये सुधारणा त्याच बरोबर मिड-रेंज सेगमेंटमध्ये प्रगत AI फिचर्स आणि दमदार बॅटरीसह हा फोन बाजारात लाँच करण्यात आला आहे.
V सीरीजमधील कंपनीचा या वर्षातील हा पहिला Vivo V50 स्मार्टफोन असून तो जबरदस्त कॅमेरा आणि मजबूत प्रोसेसर आणि क्वाड-कर्व्ड डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे.आता आपण या स्मार्ट फोनच्या स्पेसिफिकेशन्स ,किंमत आणि उपलब्धतेबद्दल सविस्तर जाणून घेऊया!
Vivo च्या V50 मध्ये आपल्याला आकर्षक क्वाड-कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, आणि तो Diamond Shield Glass Protection सोबत आपल्याला पाहिला मिळतो. हा फोन वॉटरप्रूफ असून या स्मार्ट फोनला डस्ट प्रोटेक्शन सुद्धा आहे तसेच या फोनला IP68+IP69 सर्टिफिकेशन मिळाले आहे, जे याला फोनला टिकाऊ बनवते.
या स्मार्ट फोनमध्ये आपल्याला कलर ऑप्शन्स – Titanium Grey, Rose Red आणि Starry Blue या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध झाला आहे.
AI फिचर्स बद्दल बोलायचं झालं तर Vivo V50 मध्ये अनेक प्रगत AI फिचर्स दिले आहेत, जसे की
✔ Circle to Search
✔ AI Transcript
✔ AI Live Call Translation
प्रोसेसर आणि परफॉर्मन्स संधर्भात बोलायचं झालं तर हा फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरसह येतो, जो 12GB RAM आणि उत्कृष्ट परफॉर्मन्ससह गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी सक्षम आहे.
Vivo कंपनीने आपल्या V50 स्मार्टफोनमध्ये प्रीमियम कॅमेरा सेटअप दिला असून, तो OIS (Optical Image Stabilization) सपोर्टसह येतो.
बॅक कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचं म्हटलं तर 50MP Primary Camera (OIS सह) – सुपर क्लिअर फोटो आणि स्टेबल व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि 50MP Ultra-Wide Lens – मोठ्या फ्रेमचे फोटो काढण्यासाठी सक्षम असून 4K Video Recording Support म्हणजेच उच्च दर्जाचे व्हिडिओ शूट आपल्याला करता येतात.
फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचं म्हटलं तर 50MP Auto Focus Selfie Camera स्पष्ट आणि प्रोफेशनल क्वालिटीचे सेल्फी काढता येतात तसेच Wedding Portrait Studio विशेषत वेडिंग फोटोग्राफीसाठी AI आधारित फीचर या मध्ये देण्यात आले आहे.
बॅटरी संदर्भात बोलायच झालं तर Vivo V50 मध्ये 6,000mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.Vivo कंपनीच्या मते, V50 हा फोन एवढ्या मोठ्या बॅटरीसह उपलब्ध असलेला सर्वात पातळ स्मार्टफोन पैकी एक आहे. या स्मार्टफोन मध्ये फक्त 30 मिनिटांत 70% पर्यंत चार्जिंग होते, ज्यामुळे वेळ वाचतो!
हे पण वाचा ..Samsung Galaxy S26 Ultra मध्ये 7000mAh ची बॅटरी आणि 65W ची फास्ट चार्जिंग मिळणार !
Vivo V50 ची किंमत आणि उपलब्धता :
Vivo V50 ची किंमत आणि उपलब्धता याबाबत माहिती थोडक्यात जाणून घेवू Vivo V50 च्या बेस व्हेरिएंटची किंमत ₹34,999 पासून सुरू होते.आजपासून हा फोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे आणि 25 फेब्रुवारीपासून अधिकृत विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहे Flipkart आणि Vivo च्या अधिकृत ई-स्टोअरवर हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
Vivo V50 चे फायदे:
दमदार बॅटरी – 6000mAh दीर्घकाळ टिकणारी बॅटरी
प्रीमियम डिझाइन – क्वाड-कर्व्ड डिस्प्ले आणि आकर्षक लुक
प्रगत कॅमेरा – 50MP OIS आणि 50MP अल्ट्रावाइड लेन्स
AI आधारित फिचर्स – Circle to Search, AI Live Call Translation इत्यादी.
Snapdragon 7 Gen 3 – वेगवान परफॉर्मन्ससाठी उत्कृष्ट असा प्रोसेसर
Vivo V50 चे तोटे:
या स्मार्ट फोनचा प्रोसेसर अधिक चांगला असू शकला असता याला Snapdragon 8 Gen चा पर्याय असता तर अधिक चांगले झाले असते आणि हेवी युजर्ससाठी हा स्मार्टफोन थोडा महाग वाटू शकतो.
Vivo V50 हा दमदार बॅटरी, उत्कृष्ट कॅमेरा आणि प्रगत AI फिचर्ससह एक जबरदस्त स्मार्टफोन आहे. 35,000 च्या बजेटमध्ये एक प्रीमियम स्मार्टफोन हवा असेल तुम्हाला Vivo V50 हा एक उत्तम पर्याय आहे
हे पण वाचा ..हायकोर्टाचा मोठा निर्णय Phone Recording कोर्टमध्ये पुरावा मानला जाईल..