vivo t4x भारतात लाँच: किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जाणून घ्या

vivo t4x

vivo t4x भारतात 5 मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. आपल्याला या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच FHD+ डिस्प्ले, Dimensity 7300 प्रोसेसर आणि 6500mAh बॅटरी मिळणार आहे. चला तर जाणून घेवू किंमत आणि फीचर्स.

स्मार्टफोन निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या Vivo कंपनी आपला नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन vivo t4x लाँच करण्याच्या तयारी आहे. कंपनीने नवीन स्मार्ट फोन लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली असून Vivo T4x हा स्मार्टफोन भारतात 5 मार्च 2025 रोजी लाँच करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन Flipkart, Vivo स्टोअर्स आणि अधिकृत वेबसाइटवर Vivo कंपनीच्या चाहत्यांना खरेदी साठी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, हा फोन या  सेगमेंटमधील सर्वात मोठ्या बॅटरीसह सादर केला जाणार आहे.

vivo t4x भारतात कधी लाँच होणार?

Vivo ने अधिकृतपणे जाहीर केले आहे की Vivo T4x भारतात 5 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता लाँच करण्यात येणार आहे. या स्मार्ट फोनचा Flipkart वर पोस्ट करण्यात आलेला टीझर पाहून समजते की, हा फोन दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध केला आहे ते दोन रंग म्हणजे Pronto Purple आणि Marine Blue.

Vivo T4x ची संभाव्य स्पेसिफिकेशन्स

1) डिस्प्ले आणि डिझाइन : या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. याच्या स्लिम आणि स्टायलिश डिझाइनमुळे तो अधिक आकर्षक दिसतो.

2) प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर : हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरसह सुसज्ज आहे आणि तो Android 15 आधारित UI वर चालतो. कंपनीकडून याला 2 वर्षांचे OS अपडेट आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स दिले जाणार आहेत.

3) बॅटरी आणि चार्जिंग : या स्मार्टफोनमध्ये 6500mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे, जी दीर्घकाळ टिकणारा बॅकअप प्रदान करते. तसेच, 44W फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे ती जलद चार्ज होते.

4) कॅमेरा सेटअप : या स्मार्टफोनमध्ये 50MP चा बॅक कॅमेरा आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत AI आधारित फोटो सुधारणा आणि AI Erase फीचर मिळते, जे फोटोचा दर्जा आणखी सुधारण्यास मदत करते.

हे पण वाचा..Tata Play Airtel Digital TV Merger DTH उद्योगात मोठा बदल..

Vivo T4x ची किंमत आणि व्हेरियंट्स

Vivo T4x च्या किंमतीबाबत Flipkart वर एक टीझर पोस्ट करण्यात आला आहे.to पाहिल्यानंतर समजले की, फोनची किंमत ₹12,499 पासून सुरू होऊ शकते. हा स्मार्टफोन तीन वेगवेगळ्या व्हेरियंट्समध्ये येणार आहे.

4GB RAM + 128GB स्टोरेज – ₹12,499
6GB RAM + 128GB स्टोरेज – ₹13,999
8GB RAM + 128GB स्टोरेज – ₹15,499

Vivo T4x चे विशेष फीचर्स

1) सेगमेंटमधील सर्वात मोठी बॅटरी:

Vivo T4x मध्ये 6500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी या सेगमेंटमध्ये सर्वाधिक बॅटरी क्षमता असलेल्या फोनपैकी एक आहे. हे डिव्हाईस दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसाठी ओळखले जाणार आहे.

2) AI सपोर्ट:

Vivo T4x मध्ये AI Erase आणि Photo Enhance सारखी आधुनिक AI फीचर्स वापरकर्त्यांना मिळणार आहेत.यामुळे फोटो अधिक स्पष्ट आणि आकर्षक दिसण्यास मदत होणार आहे.

3) जलद चार्जिंग:

Vivo ने या स्मार्टफोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग दिली आहे, ज्यामुळे बॅटरी झपाट्याने चार्ज करण्यास मदत होणार आहे आणि वेळ ही वाचणार आहे.

4) स्टायलिश डिझाइन आणि डिस्प्ले:

फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला मोठा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो जास्त करून आपल्याला गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्यासाठी उत्तम  आहे.

5) बजेट-फ्रेंडली किंमत:

या स्मार्टफोन ची  किंमत ₹12,499 पासून सुरू होणार असल्यामुळे  कमी बजेट कस्टमरंसाठी  हा स्मार्टफोन उत्तम पर्याय ठरणार आहे.

Vivo T4x कोणासाठी योग्य आहे?

ज्यांना मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग असलेला फोन हवा आहे. आणि ज्या ग्राहकांना 50MP कॅमेरा आणि AI फीचर्ससह उत्तम फोटोग्राफी अनुभव हवा आहे,जे ग्राहक बजेटमध्ये MediaTek Dimensity 7300 सारखा दमदार प्रोसेसर शोधत आहेत. तसेच ज्यांना Android 15 आणि लांब OS अपडेट्स मिळणारा फोन हवा आहे.किंवा  जे कमी बजेट मध्ये स्मार्टफोन घेण्याच्या तयारीमध्ये आहेत त्या सर्वांना हा स्मार्टफोन योग्य पर्याय आहे.

Vivo T4x चा मार्केटमधील स्पर्धक कोण?

भारतीय बाजारात Vivo T4x ला Redmi Note 12, Realme Narzo 60x, Samsung Galaxy M14 आणि iQOO Z7 यांसारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करावी लागणार आहे. हे सर्व स्मार्टफोन बजेट श्रेणीत दमदार स्पेसिफिकेशन्स देतात. मात्र, Vivo T4x आपल्या मोठ्या बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि नवीन Android अपडेट्सच्या जोरावर या स्पर्धेत आपले स्थान ठोकून ठेवणार आहे.

हे पण वाचा ..nothing Phone(3a) सीरीजची खास झलक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *