ADVERTISEMENT

वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत गोव्यात समुद्रकिनारी रंगणार समर-स्वानंदीचा ग्रँड विवाहसोहळा Veen Doghatli Hi Tutena

Veen Doghatli Hi Tutena ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत प्रेक्षकांना आता पहिल्यांदाच समुद्रकिनारी पार पडणारा भव्य विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. समर आणि स्वानंदीच्या ग्रँड लग्नाचं चित्रीकरण गोव्याच्या आलिशान फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडत आहे.
Veen Doghatli Hi Tutena wedding

Veen Doghatli Hi Tutena : ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या चाहत्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. मालिकेतील समर आणि स्वानंदी या जोडीचा ग्रँड लग्नसोहळा लवकरच प्रेक्षकांसमोर येणार असून, त्याची लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या लग्नसोहळ्यामुळे मालिकेच्या कथानकाला एक नवीन कलाटणी मिळणार आहे.

कथानकानुसार आधिरा आणि रोहन यांच्या प्रेमामुळे समर आणि स्वानंदी एकमेकांशी विवाह करण्याचा निर्णय घेतात. या निर्णयामागे त्यांच्या भावंडांवरील जिव्हाळा आणि भावनिक नातं आहे. समर-स्वानंदीचा हा प्रवास आता कोणते वळण घेणार, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात कोणते बदल घडणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

या खास प्रसंगाचं चित्रीकरण करण्यासाठी मालिकेची संपूर्ण टीम गोव्याला दाखल झाली आहे. दक्षिण गोव्याच्या सुंदर निसर्गरम्य परिसरात आणि आलिशान फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये हा महाविवाह सोहळा पार पडत आहे. मराठी मालिकांमध्ये पहिल्यांदाच समुद्रकिनारी लग्नाचा प्रयोग केला जात असल्याने हा सोहळा अधिकच विशेष ठरत आहे. सुंदर समुद्रकिनारा, सजवलेला मंडप, आकर्षक पोशाख आणि वातावरणीय रोमान्स यामुळे या लग्नाला सिनेमॅटिक लूक मिळणार आहे. Veena Doghantali Hi Tutena wedding

या मालिकेत एकाच वेळी दोन विवाह पार पडणार आहेत – आधिरा आणि रोहनचं तसेच समर आणि स्वानंदीचं. यामुळे मालिकेतील प्रत्येक भाग रंगतदार बनणार आहे. प्रेक्षकांना २९ ऑक्टोबरपासून ११ नोव्हेंबरपर्यंत रोज संध्याकाळी ७:३० वाजता हा भव्य सोहळा पाहायला मिळणार आहे. Veen Doghatli Hi Tutena

लग्नाच्या कार्यक्रमांची सुरुवात २९ ऑक्टोबर रोजी मुहूर्तमेढने होणार आहे. त्यानंतर मेहंदी, चुडा भरणं, हळद, सीमांत पूजन आणि अखेरचा विवाहसोहळा अशा अनेक पारंपरिक विधींनी मालिकेतील लग्नसमारंभ अधिक रंगतदार बनवला आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या या नवनवीन प्रयोगामुळे मराठी मालिकाविश्वात एक वेगळं पर्व सुरू होणार असल्याचं प्रेक्षकांना वाटतंय. समुद्रकिनारी पार पडणारा हा ग्रँड लग्नसोहळा निश्चितच मराठी मालिकांच्या इतिहासात एक संस्मरणीय क्षण ठरणार आहे.

रत्नागिरीची ‘राधिका भिडे’ ठरली मराठी पॉपची नवी ओळख; तिच्या गाण्यावर फिदा झाला महाराष्ट्र!