ADVERTISEMENT

नव्या भूमिकेत झळकली वल्लरी विराज; इंद्रनील कामतसोबत दिसणार ‘हिट अँड व्हायरल’ सिरीजमध्ये

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री वल्लरी विराज आणि इंद्रनील कामत या दोघांची जोडी आता प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या वेब सिरीजमधून झळकली आहे. ‘हिट अँड व्हायरल: द रिव्हेंज स्टोरी’ या नव्या शोमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे
vallari viraj ani indraneil kamat navi series hit and viral

vallari viraj ani indraneil kamat navi series hit and viral : मराठी मालिकांच्या जगतात आपल्या वेगळ्या अभिनयामुळे ओळख निर्माण करणारी अभिनेत्री वल्लरी विराज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतली तिची लीला ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. मालिकेच्या समाप्तीनंतर वल्लरी कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून दिसणार, याची चाहत्यांना उत्सुकता होती. आता ती उत्सुकता संपली असून वल्लरी प्रेक्षकांसमोर एका वेब सिरीजच्या माध्यमातून आली आहे.

ही नवी मायक्रो-ड्रामा सिरीजचं नाव आहे ‘हिट अँड व्हायरल: द रिव्हेंज स्टोरी’. बुलेट आणि झी ५ या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या शोमध्ये वल्लरीसोबत अभिनेता इंद्रनील कामतही झळकला आहे. पोस्टरमध्ये वल्लरी विराज आणि इंद्रनील कामत हे अमान व माया या पात्रांत दिसत आहेत. या कथानकामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

अलीकडच्या काही दिवसांत वल्लरी, इंद्रनील आणि अभिनेत्री आलापिनी निसळ यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र हे तिघं कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत, याचा खुलासा त्यावेळी झाला नव्हता. आता या नव्या शोच्या माध्यमातून त्यावरील पडदा उठला आहे. आलापिनी निसळदेखील या सिरीजचा भाग असेल का, याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

हे पण वाचा.. जुई गडकरीची पंढरपूर वारी विठुरायाच्या दर्शनानंतर सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

शोचं पोस्टर स्वतः वल्लरी विराज हिनं सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिलं. तर इंद्रनील कामतनेही शोतील एक सीन पोस्ट करत “आमची मायक्रो-ड्रामा सिरीज प्रदर्शित झाली आहे” असं लिहिलं.

इंद्रनील कामत याआधी ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेमुळे ओळखला जातो. तर वल्लरी विराज सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे आणि आलापिनीचे डान्स व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे ही जोडी नव्या सिरीजमधूनही प्रेक्षकांचं मन जिंकेल का, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.

हे पण वाचा.. पंजाबच्या पुरपरिस्थितीत सलमान खानचा मदतीचा हात ‘बिग बॉस 19 ’च्या मंचावर व्यक्त केली भावना..