punjab purgrasth madati sathi salman khan being human foundation help :बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान केवळ सिनेमातच नाही तर समाजकार्यांमध्येही नेहमी पुढे असतो. नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस १९’च्या वीकेंड एपिसोडमध्ये त्याने घरातील स्पर्धकांना अन्नाची किंमत समजावून सांगितली. यावेळीच त्याने पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचलमधील भीषण पुरस्थितीबद्दल बोलत भावनिक संदेश दिला.
शोदरम्यान सलमानने घरात वाया जाणाऱ्या अन्नावर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, “फरहाना, हे जे पोहे आहेत ना, ते शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तांदळापासून बनतात. आपण जे रोज खातो त्यामागे शेतकऱ्यांची मेहनत आहे. त्यामुळे अन्नाचा अनादर करू नका. आपल्या संस्कृतीत ताटातील शेवटचा कणसुद्धा खाल्ला जातो.” या शब्दांमुळे घरातील सदस्य शांत झाले आणि प्रेक्षकांनाही अन्नाची किंमत लक्षात आली.
याच वेळी सलमान खान ने पुरग्रस्तांचा मुद्दाही पुढे आणला. तो म्हणाला, “पंजाब, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये शेतकऱ्यांची घरे, शेती वाहून गेली आहेत. जे लोक स्वतःच्या लंगरमधून नेहमी इतरांना जेवायला घालतात, तेच आज उपाशी आहेत. अशा वेळी आपण त्यांच्यासाठी काही करणे हे आपलं कर्तव्य आहे.”
या भावनिक आवाहनावरच नाही तर प्रत्यक्ष कृतीतही सलमान खान पुढे आला आहे. त्याच्या ‘बीइंग ह्युमन फाउंडेशन’ने पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी पाच बोटी पाठवल्या आहेत. या बोटी बचावकार्यांसाठी प्रशासनाला देण्यात आल्या असून, त्यातील काही फिरोजपूर भागात तैनात केल्या गेल्या आहेत. आम आदमी पक्षाचे नेते दीपक बाली यांनी स्वतः याची पुष्टी केली.
हे पण वाचा.. निक्की तांबोळीचा ठाम पवित्रा; अरबाजला दिला पाठिंबा आणि ट्रोलर्सना दिल सडेतोड उत्तर
बचावकार्यांसोबतच परिस्थिती सामान्य झाल्यावर सलमान खान ची फाउंडेशन सीमावर्ती गावे दत्तक घेऊन त्यांच्या विकासासाठी पुढे येणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे चाहत्यांपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वत्र सलमानच्या या कार्याचं कौतुक होत आहे.
बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना दिलेला अन्नाचा धडा असो किंवा पुरग्रस्तांसाठी केलेली मदत – सलमान खान पुन्हा एकदा फक्त अभिनेता नाही तर समाजासाठी जबाबदार नागरिक असल्याचं सिद्ध करत आहे.
हे पण वाचा.. शॉर्टलिस्ट व्हायचे पण काम मिळायचं नाही’ सुचित्रा बांदेकरांनी सांगितला विद्या बालनशी जोडलेला किस्सा









