ADVERTISEMENT

“माझा पीआर नाही, तरी आजही काम मिळतं!” – उषा नाडकर्णी यांची टोलेबाज प्रतिक्रिया, म्हणाल्या..

usha nadkarni speaks on success without pr : जेष्ठ अभिनेत्री Usha Nadkarni यांनी मराठी इंडस्ट्रीतील टीकाकारांना दिलं करारी उत्तर. "माझा पीआर नाही, मॅनेजर नाही तरी आजही काम मिळतं," असं स्पष्ट सांगत त्यांनी मत्सर करणाऱ्यांना सुनावलं आहे.
usha nadkarni speaks on success without pr

usha nadkarni speaks on success without pr : मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री Usha Nadkarni पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नेहमी स्पष्ट आणि ठाम मत व्यक्त करणाऱ्या या अभिनेत्रींनी अलीकडेच मराठी इंडस्ट्रीतील वातावरणावर भाष्य करत काही लोकांना करारा टोला लगावला आहे.

‘माहेरची साडी’ या लोकप्रिय चित्रपटाच्या कलाकारांची नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ या कार्यक्रमात भेट झाली. या मुलाखतीदरम्यान Usha Nadkarni यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीचा आणि मराठी इंडस्ट्रीतील अनुभवाचा उल्लेख करत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

त्या म्हणाल्या, “आता माझं वय झालं आहे, त्यामुळे मी ज्या गोष्टी बोलते त्या मुद्दाम बोलते. आमच्या इंडस्ट्रीत एखाद्याचं कौतुक केलं की लोकांना जळफळाट होतो. काहीजण माझ्याबद्दल बोलतात पण त्यांना समजत नाही की मी इतकी वर्ष काम करतेय म्हणजे मी वाईट नाही. जर मी कोणाला त्रास दिला असता, तर एवढी वर्ष मी टिकले असते का?”

Usha Nadkarni पुढे म्हणाल्या, “माझा कोणी पीआर नाही, मॅनेजर नाही, तरी मला कामं मिळतात. मराठी असो वा हिंदी, मला दोन्हीकडे काम मिळतं. काही लोक काम नसताना फक्त वाट बघत बसतात, पण मी कधी तसं करत नाही.”

त्या पुढे एका प्रसंगाचा उल्लेख करत म्हणाल्या, “मी पुण्यात एका जाहिरातीचं शूट केलं. तेव्हा निर्मात्याने सांगितलं की काही लोकांनी तुम्हाला काम देऊ नका असं सांगितलं आहे. मी तेव्हा हसून म्हटलं, जर ते लोक माझ्याबद्दल असं बोलत असतील, तर याचा अर्थ मी मोठी झाले आहे. कारण मोठ्या लोकांबद्दलच मागून बोललं जातं.”

Usha Nadkarni यांनी लता बाईंच्या आठवणींनाही उजाळा दिला. त्या म्हणाल्या, “लता बाईंनी मला मास्टरशेफच्या वेळी फोन केला होता. त्यांनी सांगितलं, ‘ते लोक तुला किती प्रेम करतात.’ पण आपल्या मराठी इंडस्ट्रीत असं प्रेम कमीच दिसतं. इथे काम नसेल तर लोक दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यात वेळ घालवतात.”

हे पण वाचा.. गंधार खरपुडीकरचं स्वप्न साकार! पुण्यात घेतलं हक्काचं घर, दिवाळीच्या मुहूर्तावर चाहत्यांशी शेअर केली आनंदवार्ता

या स्पष्टवक्तेपणामुळे पुन्हा एकदा Usha Nadkarni चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. आपल्या मेहनतीवर आणि निष्ठेवर विश्वास ठेवणाऱ्या या अभिनेत्रीने दाखवून दिलं आहे की, चांगलं काम आणि प्रामाणिकपणा असेल, तर पीआर किंवा मॅनेजरची गरज भासत नाही.

हे पण वाचा.. “‘मी त्याला शिवी दिली…’ महेश मांजरेकरांचा सलमानवर संताप, पुढील चित्रपटावर घेतला मोठा निर्णय!”

usha nadkarni speaks on success without pr