स्टार प्रवाहवरील “तू ही रे मितवा” ( Tu hi re maza mitwa serial ) ही मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. मालिकेतील अर्णव आणि ईश्वरी यांची केमिस्ट्री लोकांना विशेष आवडते. ( Abhijit Amkar gf ) सततच्या भांडणांमधूनही एकमेकांप्रती असलेली माया आणि काळजी यामुळे ही जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. अर्णवची भूमिका अभिनेता अभिजीत आमकर साकारत असून, ईश्वरीच्या भूमिकेत अभिनेत्री शर्वरी जोग आहे.
Table of Contents
अभिजीत सध्या मराठी मनोरंजनसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर सोबत प्रेमसंबंधात आहे. नक्षत्राने सोशल मीडियावर अभिजीतसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामध्ये ती त्याच्यावरील प्रेम व्यक्त करताना दिसते. या गोड कपलचे एकमेकांवरील प्रेम फोटो आणि व्हिडिओतून स्पष्ट जाणवते. त्यांच्या चाहत्यांना देखील ही जोडी खूपच आवडते.
शर्वरी जोगने काही वर्षांपूर्वीच तिच्या खऱ्या प्रेमाची कबुली दिली होती. ती अभिनेता गौरव मालवणकर ला डेट करत असल्याचे चाहत्यांना माहीत आहे. पण अभिजीत आमकरच्या आयुष्यातील मितवा कोण आहे? याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
नक्षत्रा मेढेकर कोण आहे? Abhijit Amkar gf
नक्षत्रा मेढेकर ही मराठी मालिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री आहे. तिने “लेक माझी लाडकी” आणि “चंद्र आहे साक्षीला” या गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्याशिवाय तिने “प्रितम,” “फतेशिकस्त,” आणि “सापळा” यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अभिनयासोबतच ती तिच्या ग्लॅमरस लूकसाठीही ओळखली जाते. ( Abhijit Amkar gf )
एका रात्रीचे किती पैसे घेणार? – Surekha Kudachi नां इंडस्ट्रीत आलेला धक्कादायक अनुभव!
अभिजीत आमकरने स्टार प्रवाहवरील “अरे वेड्या मना” या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्याने “आय प्रेम यू,” “टकाटक,” आणि “एक सांगायचंय” यांसारख्या सिनेमांमध्ये काम करत आपली ओळख निर्माण केली. सध्या तो “तू ही रे मितवा” मालिकेत अर्णव ही व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याचा स्टायलिश लूक आणि जबरदस्त अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो.
अर्णव आणि ईश्वरी – सर्वात स्टायलिश जोडी
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात अर्णव आणि ईश्वरीला “मोस्ट स्टायलिश जोडी” हा पुरस्कार मिळाला आहे. मालिकेमध्ये त्यांच्या प्रेमाचा प्रवास खूपच रंगतदार पद्धतीने मांडण्यात आला आहे. सुरुवातीला एकमेकांसोबत अजिबात पटत नसले तरी, हळूहळू त्यांच्या नात्यातील गोडवा वाढताना दिसत आहे. ही अनोखी प्रेमकथा पाहणं प्रेक्षकांसाठी खूपच रोमांचक ठरत आहे. ( Abhijit Amkar gf )
या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. अर्णव आणि ईश्वरी यांच्यातील गोड केमिस्ट्री, सुंदर कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ही मालिका घराघरात पोहोचली आहे. प्रेक्षकांना मालिकेतील प्रत्येक वळणाची उत्सुकता लागून राहते.
आता पुढे या मालिकेत कोणते नवे ट्विस्ट येणार? अर्णव आणि ईश्वरीच्या नात्यात आणखी कोणते रंग दिसणार? हे पाहणं नक्कीच रोचक ठरेल!