ADVERTISEMENT

थँक्यू नाही, आता आय लव यू! तू ही रे माझा मितवा मालिकेत ईश्वरी अर्णवकडे  व्यक्त करणार मनातील प्रेम

tu hi re majha mitwa ishwari arnav love update : तू ही रे माझा मितवाच्या नव्या प्रोमोमध्ये ईश्वरी वाढदिवशी अर्णवला प्रेमाची कबुली देणार असल्याचे संकेत मिळताच मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
tu hi re majha mitwa ishwari arnav love update

tu hi re majha mitwa ishwari arnav love update : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका तू ही रे माझा मितवा (Tu Hi Re Majha Mitwa) पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सुरुवातीपासूनच अर्णव आणि ईश्वरीची केमिस्ट्री चाहत्यांना भुरळ घालत आली आहे. हळूहळू जवळ येत जाणाऱ्या या जोडीच्या नात्याला आता प्रेमाची नवी दिशा मिळणार असल्याचे मालिकेच्या ताज्या प्रोमोमधून स्पष्ट झाले आहे. ‘Thank You नाही, आता I Love You’ या वाक्यामुळे सध्या सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे.

मालिकेच्या टीआरपीत सातत्याने होत असलेल्या वाढीनंतर तू ही रे माझा मितवा ही मालिका काही दिवसांपासून रात्री ८ वाजता प्राइम टाइम स्लॉटमध्ये दाखवली जात आहे. कथानकातही सध्या रोमँटिक ट्विस्ट्सची मालिका पाहायला मिळत असून यामुळे मालिकेचा चाहता वर्ग अधिकच मजबूत होत आहे.

अर्णवच्या मनात ईश्वरीबद्दल प्रेम आहे, हे अनेक प्रसंगांत सूचित झाले आहे. मात्र त्याला ते शब्दांत मांडण्याचं धैर्य कधी मिळालं नव्हतं. ईश्वरीच्या मनातही अर्णवबद्दलचे भाव दाटले असले, तरी योग्य संधीची वाट पाहणारी ईश्वरी आतापर्यंत शांत होती. पण नवीन प्रोमोने दोघांच्याही नात्याला एक टर्निंग पॉइंट मिळणार असल्याची खात्री चाहत्यांना पटली आहे.

या प्रोमोमध्ये अर्णवने ईश्वरीच्या वाढदिवसानिमित्त खास सरप्राइज प्लॅन केलेलं दिसतं. ती नेहमी म्हणत असलेल्या “हम इंदौर से है” या वाक्याची आठवण ठेवून त्याने घरात इंदौरची झलक असलेलं सुंदर डेकोरेशन केलं आहे. इंदौरच्या खास वातावरणाचा साजशृंगार पाहताच ईश्वरी भावूक होते. आणि याच भावनेच्या भरात ती अर्णवला “Thank You नाही, आता तुम्हाला जोरात रडत I Love You म्हणायचं आहे” असं सांगताना दिसते.

हा एपिसोड ४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीजनंतर काही तासांतच प्रोमोला सोशल मीडियावर भरघोस प्रतिसाद मिळाला असून चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, वाढदिवसाच्या या सरप्राइज प्लॅनिंगची खबर राकेश आणि मामीच्या कानावर गेल्याने आगामी भागांत काहीतरी अडथळा येण्याची शक्यता दिसत आहे. अर्णवचं प्लॅनिंग यशस्वी होणार की नाही आणि ईश्वरी अखेर तिच्या प्रेमाची कबुली देणार का, हे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

हे पण वाचा.. सूरजच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकरने तब्येत सुधारल्याचे सांगत व्हिडीओ शेअर केला

तू ही रे माझा मितवा चाहत्यांसाठी हा नक्कीच भावुक आणि रोमँटिक क्षण ठरणार आहे. मालिकेची लोकप्रियता आणखी वाढवणारा हा ट्रॅक चर्चेत राहणार हे निश्चित.

हे पण वाचा.. विवाहानंतर प्राजक्ता गायकवाड शंभुराज खुटवड जेजुरी दर्शनाला व्हिडिओ व्हायरल; परंपरेने भारलेला सुंदर क्षण!

tu hi re majha mitwa ishwari arnav love update