tharala tar mag sayali dohale arjun ladu promo : ‘ठरलं तर मग’ या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत सध्या आनंद, कौटुंबिक भावना आणि रहस्य यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळत आहे. कथानकात सायलीच्या आयुष्यातील एका खास टप्प्याची सुरुवात होत असून तिच्या डोहाळ्यांच्या निमित्ताने सुभेदार कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना भावनिक आणि हलक्याफुलक्या प्रसंगांची मेजवानी मिळणार असल्याचे प्रोमोमधून स्पष्ट झाले आहे.
सायली गरोदर असल्यापासून अर्जुन तिच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या इच्छेला महत्त्व देताना दिसत आहे. दोघेही एकत्र वेळ घालवत बाहेर फिरायला जातात आणि या खास क्षणांचा मनमुराद आनंद घेतात. सायलीचा प्रत्येक हट्ट पूर्ण करण्यासाठी अर्जुन नेहमीच पुढे असतो. याच प्रेमातून तो तिच्यासाठी स्वतःच्या हाताने लाडू तयार करण्याचा प्रयत्न करतो. लाडू बनवताना त्याला अडचणी येतात, आकार नीट जमत नाही, तरीही नवऱ्याने प्रेमाने केलेला हा प्रयत्न पाहून सायली आनंदाने ते लाडू खाते.
दरम्यान, घरात सायलीसाठी आणखी एक छोटंसं सरप्राईज तयार असतं. तिची आई प्रतिमा तिच्यासाठी सुगंधी फुलांचा गजरा घेऊन येते. मात्र या गजऱ्यामुळे घरात एक मजेशीर प्रसंग घडतो. फुलांच्या सुगंधामुळे अर्जुनला सतत शिंका येऊ लागतात. त्याची ही अवस्था पाहून घरातील सर्वजण आश्चर्यचकित होतात. त्यावेळी कल्पना सांगते की अर्जुनला फुलांची अॅलर्जी आहे. मात्र काही क्षणांत सायलीलाही शिंका येऊ लागतात आणि वातावरणात हास्याची लाट पसरते.
सायलीची आई प्रतिमा यावर गंमतीने प्रतिक्रिया देत म्हणते की, जर अर्जुनला फुलांचा त्रास होत असेल तर पोटातील बाळालाही तो सुगंध आवडत नसावा. तिच्या या बोलण्यावर घरातील सर्वजण मोठ्याने हसू लागतात. सायली आणि अर्जुनची हलकीफुलकी फिरकी घेत संपूर्ण कुटुंब आनंदाचे क्षण अनुभवताना दिसणार आहे.
दुसऱ्या बाजूला मालिकेतील नकारात्मक घडामोडीही वेग घेत आहेत. प्रिया तुरुंगात असतानाही सुभेदार कुटुंबाविरुद्ध नवे डाव आखताना दिसत आहे. तिची भेट घेण्यासाठी आलेल्या एका रहस्यमय तरुणीची ओळख अद्याप समोर आलेली नसली, तरी तिच्या एन्ट्रीमुळे कथेत नवे रहस्य निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर या पात्राबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात असून अभिनेत्री संचिता कुलकर्णी या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
हे पण वाचा.. ठरलं तर मग मध्ये नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; प्रियाला जेलमध्ये भेटायला आलेली तरुणी कोण? नव्या ट्विस्टची जोरदार चर्चा
याशिवाय अश्विन आणि प्रियाच्या नात्यात पुढे काय घडणार, तसेच सुभेदार कुटुंब सायलीची काळजी कशा प्रकारे घेणार, याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. भावनिक क्षण, कौटुंबिक प्रेम आणि रहस्याने भरलेले ‘ठरलं तर मग’ मालिकेचे आगामी भाग प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहेत.
हे पण वाचा.. कमळी मालिकेत धक्कादायक ट्विस्ट! आई जिवंत असल्याचं होणार उघड, साईबाबांच्या मंदिरात मायलेकी येणार आमनेसामने?









