ADVERTISEMENT

Tharala Tar Mag : सायलीच्या आनंदावर कल्पनाची घाला, नागराजची हातचलाखी; बायको-वहिनीवर खोटा आळ

ठरलं तर मग मालिकेत आजच्या भागात सायली-अर्जुनच्या नात्यात तणाव, कल्पनाचे आडमुठे वागणे आणि नागराजच्या हातचलाखीने घरात निर्माण झालेला गोंधळ अशा घटनांची मालिका पाहायला मिळाली.
Tharala Tar Mag 9 aug

ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत 9 ऑगस्टच्या भागात घरात भावनांचा कल्लोळ पाहायला मिळाला. अर्जुनच्या मस्करीमुळे आधीच नाराज असलेली सायली, त्याच्या वागण्यावर आणखी भडकते. चैतन्यने अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी घरातील सर्वजण अर्जुनवर रागावलेले असतात. अर्जुन आपल्या चुकांची कबुली देत माफी मागतो, पण सायलीला झालेली भीती आणि त्रास कमी होत नाही.

Tharala Tar Mag मालिकेत सायलीचा राग, कल्पनाचा विरोध आणि नागराजची हातचलाखी

सायली रागाने रूममध्ये जाऊन बसते. अर्जुन आणि चैतन्य तिच्या मागे जाऊन दार ठोठावतात, बराच वेळ विनंती करून शेवटी ती दार उघडते. अर्जुनने उठाबशा काढून माफी मागण्याचा प्रयत्न केला तरी सायलीचा राग कमी होत नाही. अखेरीस ती चॅलेंज देते — तिचा राग घालवायचा असेल तर सगळ्या सासरच्या मंडळींना माहेरी घेऊन यावे लागेल. अर्जुन हा प्रस्ताव मान्य करतो आणि खाली येऊन सर्वांसमोर जाहीर करतो.

प्रताप तत्काळ तयार होतो, पण कल्पना मात्र याला विरोध करते. एकदा माहेरी गेल्यावर पुढे काय भोगावं लागलं, याची तक्रार करत ती निघून जाते. तिच्या बोलण्याने सायली दुखावली जाते, पण ती शांत राहते. कल्पनासोबतच पूर्णा आजीही जायला नाखूष असते, त्यामुळे प्रताप दोन्ही बाजूंमध्ये अडकतो.

दरम्यान, घरात दुसरीकडे नागराजची कारस्थानं सुरू असतात. प्रतिमाच्या विसराळूपणाबाबत डॉक्टर आले असताना, गोळ्यांची तपासणी करण्याची वेळ येते. चुकीच्या गोळ्या देत असल्याचे उघड होईल, या भीतीने नागराज गोळ्या आणण्याचे नाटक करतो आणि गुपचूप त्या खिशात ठेवतो. नंतर तो सुमनवर गोळ्या हरवल्याचा आरोप करतो. सुमन शोधाशोध करते पण गोळ्या सापडत नाहीत. डॉक्टर नाराज होऊन नवीन गोळ्या लिहून देतात.

नागराज मुद्दाम खिडकीबाहेर गोळ्या फेकून प्रतिमावरच विसराळूपणाचा आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. प्रतिमा सुरुवातीला विरोध करते, पण सततच्या आरोपामुळे ती स्वतःच्या आठवणीवरच शंका घेऊ लागते.

आजच्या भागात Tharala Tar Mag मालिकेने कौटुंबिक नाती, गैरसमज आणि कटकारस्थानांचा संगम प्रेक्षकांसमोर रंगवला. सायली-अर्जुनच्या नात्यातील गोड-तिखट संवाद, कल्पनाचा आडमुठेपणा आणि नागराजच्या चतुराईमुळे पुढील भागात अधिक रंगत वाढणार आहे.