स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘Tharala Tar Mag’ सध्या प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतेय. मालिकेतील प्रत्येक नवीन प्रोमो चर्चेचा विषय ठरत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे कथेत नवा ट्विस्ट येणार असल्याचे स्पष्ट झाले असून, या वेळी जीवावर बेतणारी थरारक घटना घडणार आहे.
१८ ऑगस्टच्या भागात दाखवण्यात आले की, सायली महिपतच्या घरी पोहोचते आणि थेट त्याला धमकी देते. मधुभाऊंवर झालेल्या हल्ल्यामागे महिपतच असल्याचा तिचा ठाम संशय असतो. त्यामुळे ती स्पष्ट शब्दांत म्हणते की, “माझ्या कुटुंबियांना काही झालं तर मी तुला संपवेन.” तिच्या या इशाऱ्यामुळे महिपत भडकून जातो. खरे तर, मधुभाऊंवर चाकू हल्ला नागराजने केला होता. मात्र त्यांच्या मृत्यूऐवजी ते कोमात जातात. हे ‘अर्धवट काम’ पाहून महिपत संतापतो आणि नागराजवर राग काढतो.
हे पण वाचा: Jui Gadkari ची भावनिक पोस्ट : “पूर्णा आजी, वाटलं होतं तू परत येशील…”
याच पार्श्वभूमीवर आगामी भागाच्या प्रोमोमध्ये दिसते की नागराज हे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. मधुभाऊंवर पुन्हा जीवघेणा वार करण्याचा त्याचा डाव रंगतो का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
दरम्यान, पोलीसही या प्रकरणात तपास सुरू करतात. सायली आणि अर्जुनचा जबाब नोंदवण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये येतात. सायली पोलिसांना सांगते की, आमंत्रितांपैकी कोणावरही संशय नाही, पण महिपत शिखरे हा या हल्ल्यामागे असल्याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. तिचा आवाजातील आत्मविश्वास आणि महिपतच्या पूर्वीच्या गुन्हेगारी वागणुकीमुळे प्रेक्षकांना हा तर्क पटतो. Tharala Tar Mag 19 aug promo
प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, सायली पोलिसांशी बोलत असतानाच नागराज मधुभाऊंच्या रूममध्ये प्रवेश करतो. कुठलाही विचार न करता तो मधुभाऊंचा ऑक्सिजन मास्क काढतो. त्याच वेळी सायली तेथे पोहोचते आणि तिला धक्का बसतो. हा प्रसंग पाहून अनेक प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले आहेत. मात्र, हा सीन खरोखर घडतो की फक्त प्रोमोमधील ‘सस्पेन्स बिल्ड-अप’ आहे, हे १९ ऑगस्टच्या भागातच कळणार आहे.
या धक्कादायक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मालिकेतील एक दु:खद बातमी प्रेक्षकांच्या समोर आली. मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे १६ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या अभिनयामुळे पूर्णा आजी हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले होते. सोशल मीडियावर चाहत्यांनी श्रद्धांजली अर्पण करताना स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “पूर्णा आजीच्या जागी दुसऱ्या कोणाला पाहण्याची कल्पना करणेही अशक्य आहे.” त्यामुळे आता हे पात्र कोण साकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘Tharala Tar Mag’ मालिकेतील ही आगामी घटना प्रेक्षकांच्या मनात तणाव निर्माण करत असून, सायली नागराजला रंगेहात पकडते की नाही, हा खरा प्रश्न आहे. नागराजच्या या पावलामुळे मालिकेत मोठा कलाटणी येणार हे निश्चित आहे.









