Tharala Tar Mag Madhubhau reveals sayali secret truth : ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) ही सध्या चर्चेत असलेली मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरली आहे. मालिकेत सध्या चालू असलेला ट्रॅक प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतो आहे. काही दिवसांपूर्वीच सुभेदार कुटुंबात प्रियाच्या आई-वडिलांचं आगमन झालं होतं. मात्र, या घटनेमुळे सर्वजण सायलीच्या पालकांविषयी चुकीचा निष्कर्ष काढतात आणि गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतात.
सदाशिव आणि मैनावती हे सायलीचे आई-वडील असल्याचा गैरसमज अर्जुनसह सगळ्यांनाच होतो. पण, सायलीच्या आणि मैनावतीच्या स्वभावातला तफावत पाहून अर्जुनच्या मनात शंकेची बीजं रुजतात. सायली शांत, संयमी आणि मेहनती तर मैनावती थोडी आक्रमक आणि दिखाऊ. हा फरक लक्षात घेऊन अर्जुन DNA चाचणी करवतो, मात्र त्याचे रिपोर्ट्स प्रिया बदलते आणि त्यामुळे सगळं चित्रच पालटलं जातं.
सायली मात्र आपल्या मनात ठाम असते की हे लोक तिचे खरे आई-वडील नाहीत. ती सत्य उलगडण्यासाठी ठाम निर्णय घेते. मैनावती आणि सदाशिव यांच्या घराच्या चाव्या मिळवून ती शोध सुरू करते. यादरम्यान प्रिया तिच्या आड येण्याचा पूर्ण प्रयत्न करते. पण सायली मागे हटत नाही. अखेर ती मधुभाऊंना भेटण्यासाठी रुग्णालयात जाते, कारण तिचा विश्वास असतो की तेच सर्व सत्य सांगू शकतात.
सायली रडत-रडत मधुभाऊंना विचारते, “मधुभाऊ, हे माझे खरे आई-वडील नाहीत ना?” आणि तिच्या डोळ्यांसमोर मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करून संकेत देतात. सायली पुढे म्हणते, “जर हे माझे आई-बाबा नसतील तर पुन्हा एकदा इशारा द्या…” आणि ते पुन्हा प्रतिसाद देतात. त्या क्षणी सायलीचा संशय खरा ठरतो आणि ती आनंदाश्रूंनी भरून येते.
हे पण वाचा.. लग्नानंतर होईलच प्रेम फेम अनुष्का पिंपुटकर लग्नबंधनात अडकणार; फक्त ६ दिवस शिल्लक, Bride To Be पार्टीचे फोटो व्हायरल
या घटनेनंतर मालिकेचा प्रवाह एकदम वेगळा वळण घेणार आहे. आता सायली हे सत्य अर्जुनसमोर कसं मांडते, त्याचा पुढचा परिणाम काय होतो, याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) मालिकेचा हा विशेष भाग १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार असून, या भागात सायलीच्या आयुष्याचा सर्वात मोठा उलगडा पाहायला मिळणार आहे.
हे पण वाचा.. 89 वर्षीय दिग्गज अभिनेते धर्मेंद्र देओल यांचे निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास









