ADVERTISEMENT

ठरलं तर मग फेम प्रियांका तेंडोलकरचं आलिशान नवीन घर पाहिलंत का? सुंदर देव्हारा खास इंटिरिअरवर Priyanka Tendolkar

ठरलं तर मग मालिकेतील ‘प्रिया’ म्हणजेच अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर ( Priyanka Tendolkar ) हिने नुकतंच तिचं नवीन घर खरेदी केलं असून, तिचं घर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. सुंदर देव्हारा, कलात्मक पेंटिंग आणि वास्तुशास्त्रानुसार सजावट यामुळे तिचं घर खूपच खास बनलं आहे.
Priyanka Tendolkar New House

Priyanka Tendolkar New House: लोकप्रिय मराठी मालिका ‘ठरलं तर मग’ मधील खलनायिका प्रिया म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर सध्या तिच्या नवीन घरामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच तिने स्वतःचं २ बीएचके असं सुंदर घर खरेदी केलं असून, तिच्या घराची झलक पाहून चाहते भारावून गेले आहेत.

प्रियांकाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदवार्ता चाहत्यांशी शेअर केली होती. त्यानंतर ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत तिने तिच्या नव्या घराबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. प्रियांका म्हणाली की ती आधी चाळीत राहत होती, त्यानंतर ती व तिचे आई-वडील एका बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाले आणि आता अखेर त्यांनी स्वतःचं मोठं व प्रशस्त असं घर घेतलं आहे.

तिने तिच्या घराचं इंटिरिअर स्वतःच केलं असून ती स्वतः इंटिरिअर डिझायनरही आहे. प्रियांका सांगते, “मी घराचं इंटिरिअर करताना फक्त सौंदर्य नाही तर खर्चही लक्षात घेतला. योग्य नियोजन केलं, तर कमी बजेटमध्ये सुंदर घर तयार करता येतं.” तिच्या घरातील प्रत्येक कोपरा तिच्या सौंदर्यदृष्टीची झलक दाखवतो.

वास्तुशास्त्राबद्दल बोलताना ती म्हणाली की तिची आई वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवते आणि तिच्या सल्ल्यानुसारच घरातील अनेक गोष्टींची मांडणी केली गेली आहे. “देव्हारा, मनी प्लँट, बेडरूममधील आरसा — सगळं काही वास्तुशास्त्रानुसार ठेवलं आहे,” असं प्रियांका Priyanka Tendolkar हसत सांगते.

तू ही रे माझा मितवा मालिकेच्या सेटवरचा धमाकेदार फाईट सीन! अर्णव–ईश्वरीच्या ॲक्शन सिक्वेन्सचा व्हिडीओ चर्चेत

तिच्या घरात पांढऱ्या शुभ्र भिंतींवर रंगीबेरंगी मोठं पेंटिंग लावलं असून, ते घराचं सौंदर्य आणखीनच खुलवतं. लाकडी फर्निचर, आकर्षक लाईटिंग आणि सुंदर असा देव्हारा हे तिच्या घराचं वैशिष्ट्य ठरतं. प्रियांका सांगते की तिने जुन्या घरातून फक्त देव्हारा सोबत घेतला आणि त्यालाच नव्या घरात खासपणे सजवलं.

या घरात तीन बाल्कनी, दोन बेडरूम, सुंदर हॉल आणि आकर्षक किचन आहे. मुलाखतीदरम्यान तिने पहिल्यांदाच तिच्या नव्या घराची झलक दाखवली. सध्या चाहत्यांमध्ये तिच्या या घराचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि सर्वत्र एकच चर्चा – “प्रियांका तेंडोलकरचं Priyanka Tendolkar नवीन घर म्हणजे साधेपणा आणि सौंदर्य यांचं अप्रतिम मिश्रण!”