ADVERTISEMENT

Tharala Tar Mag 19 Aug प्रियाच्या खोट्या प्रेमात अडकला अश्विन, नागराजचा मधुभाऊंना संपवण्याचा डाव हुकला!

‘ठरलं तर मग’च्या 19 ऑगस्टच्या भागात घरातील नातेसंबंध अधिकच गुंतागुंतीचे होताना दिसणार आहेत. अश्विनवर प्रियाचा इतका प्रभाव पडतो की तो स्वतःच्या आईवडिलांशीही उर्मटपणे वागतो, तर दुसरीकडे नागराज मधुभाऊंचा जीव घेण्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. मात्र त्याचा डाव अयशस्वी ठरतो. Tharala Tar Mag 19 Aug
Tharala Tar Mag 19 Aug

Tharala Tar Mag 19 Aug : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मध्ये रोज नवनवीन वळणं पाहायला मिळतात. 19 ऑगस्टच्या भागात प्रेक्षकांना तणाव, नाट्य आणि रहस्य यांचा मिलाफ अनुभवायला मिळणार आहे.

एपिसोडच्या सुरुवातीला अश्विनच्या वागण्यात मोठा बदल जाणवतो. प्रियाच्या प्रेमात आंधळा झालेला अश्विन इतका तिच्या प्रभावाखाली आहे की आई कल्पना आणि वडील प्रताप यांच्यासमोरही तो उर्मटपणे बोलतो. प्रताप त्याला आठवण करून देतात की मधुभाऊ म्हणजे त्याचे सासरे असून, त्यांची चौकशी करणे हे त्याचे कर्तव्य आहे. मात्र अश्विन उलट त्यांच्यावरच प्रश्नांचा भडिमार करतो – “मधुभाऊ माझे सासरे आहेत हे तुम्हाला आठवतं, पण तुमची एक सून तुरुंगात आहे हे तुम्हाला आठवत नाही का?” अशा शब्दांनी घरातील वातावरण ताणले जाते.

दरम्यान, कल्पनाला मनातून सायलीबद्दल माया असली तरी ती तोंडावर काहीच व्यक्त करत नाही. प्रताप तिच्या बोलण्यातून ही भावना समजून घेतो, पण कल्पना स्पष्ट सांगते – “एकदा फसवणूक केलेल्या मुलीवर पुन्हा विश्वास ठेवता येत नाही.” हे वाक्य ऐकून सायलीशी तिच्या नात्याचा गोफ अजून गुंतागुंतीचा होतो. Tharala Tar Mag 19 Aug

दुसरीकडे, नागराजच्या मनात मात्र गुन्ह्याच्या सावल्या अधिक गडद होतात. त्याला एक भयानक स्वप्न पडतं, ज्यात मधुभाऊंनी पोलिसांसमोर त्याचं नाव घेतल्याचं तो पाहतो. जाग आल्यावर तो घाबरून जातो आणि ठरवतो – मधुभाऊ शुद्धीवर येण्याआधीच त्यांचा कायमचा अंत केला पाहिजे.

याच विचाराने तो रुग्णालयात पोहोचतो. सायली फोनवर बोलत असताना नागराज हळूच मधुभाऊंच्या रूममध्ये शिरतो आणि त्यांचा ऑक्सिजन मास्क काढतो. पण सायली जवळ येत असल्याची चाहूल लागताच तो घाईघाईने मास्क पुन्हा लावतो. हा क्षण जीवघेणा ठरला असता, पण मधुभाऊ थोडक्यात वाचतात. सायलीला नागराजच्या हालचाली संशयास्पद वाटतात, मात्र तो आपली गोष्ट सांगून प्रसंग आटोपतो – “इथे माझा एक मित्र ऍडमिट आहे, म्हणून आलो होतो.”

याचवेळी महिपत आणि नागराज यांच्यातील मतभेदही समोर येतात. अर्जुनने मधुभाऊंच्या हत्येचं खापर महिपतावर फोडलं असल्याचं त्याला समजतं. त्यामुळे तो संतापतो. पण नागराज मात्र या वेळी त्याला पाठिंबा देत नाही. यामुळे महिपतही अर्जुनला धडा शिकवायचा निर्णय घेतो.

दरम्यान, कुसुम रुग्णालयात येऊन मधुभाऊंना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. पण तिच्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडत नाही. अर्जुनलाही नागराजच्या रुग्णालयात उपस्थितीबद्दल संशय येतो. कारण नागराजचा मधुभाऊंशी काहीही संबंध नसताना तो तिथे काय करायला आला होता? मात्र सायली त्याला नागराजने सांगितलेलीच गोष्ट सांगते. Tharala Tar Mag 19 Aug Full Episode

हे पण वाचा: पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर लग्नबंधनात? बांदेकर कुटुंबीयांत चर्चांना उधाण

या सगळ्या घटनांमुळे ‘ठरलं तर मग’च्या पुढील भागांमध्ये नक्की काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. अश्विनवरचं प्रियाचं वर्चस्व, कल्पनेची दडवलेली माया, नागराजचा घातकी डाव आणि अर्जुनची शंका – या सर्व धाग्यांनी मालिकेचं कथानक आणखी रंगतदार होणार हे निश्चित आहे.