ADVERTISEMENT

आश्रम केस पुन्हा उघडणार! महिपतला मिळाला नवा वकील सायलीच्या भूतकाळाने खळबळ Tharala Tar Mag 20 Aug

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका “ठरलं तर मग” मध्ये 20 ऑगस्टच्या भागात आश्रम प्रकरणाचा धागा पुन्हा जुळताना दिसणार आहे. महिपतला मिळालेला महागडा वकील, नागराजचे कारस्थान, आणि अर्जुनला सायलीच्या आई-वडिलांविषयी मिळालेली माहिती—या सर्व गोष्टी मालिकेच्या कथानकात नवे वळण आणणार आहेत.
Tharala Tar Mag 20 Aug

Tharala Tar Mag 20 Aug : स्टार प्रवाहची गाजलेली मालिका “ठरलं तर मग” प्रेक्षकांना नेहमीच नवा ट्विस्ट देत आली आहे. 20 ऑगस्टच्या भागात मालिकेचा कथानक आणखी गहिरं होणार आहे. सायली, अर्जुन, अस्मिता, महिपत, नागराज आणि कुसुम यांच्या आजूबाजूला फिरणाऱ्या या कहाणीमध्ये आश्रम प्रकरण पुन्हा चर्चेत येत असून, पुढील भागांमध्ये तुफान घडामोडी होण्याची चिन्हं दिसत आहेत.

घरी परतल्यावर थकलेली आणि खचलेली सायली अस्मिताला भेटते. अस्मिता तिला आधार देत म्हणते, “माझं बाळ सांगतंय मामी, आता रडायचं नाही. मधु आजोबा लवकरच घरी येणार आहेत.” या शब्दांनी सायलीच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. प्रतापसुद्धा सायलीला धीर देतो की हे घर तिचं माहेर आहे. या आपुलकीच्या क्षणांमुळे सायलीला बहिणीची उणीव कधी जाणवलीच नाही, हे ती स्पष्ट करते. Tharala Tar Mag 20 Aug

सायलीच्या या भावनांमुळे अर्जुनला पुन्हा तिच्या आई-वडिलांचा शोध घ्यायचा निर्धार होतो. त्यासाठी तो कुसुमकडे पोहोचतो. सायलीच्या बालपणाविषयी माहिती मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. कुसुम त्याला सांगते की 20-22 वर्षांपूर्वीच सायली मधु भाऊंना भेटली होती. ती स्वतः 7-8 वर्षांपूर्वीच आश्रमात आली होती. अचानक अर्जुनकडून आलेल्या या चौकशीमुळे कुसुमला शंका येते. त्यावेळी अर्जुन सांगतो की त्याला माहिती मिळाली आहे—सायलीचे आई-वडील जिवंत आहेत! या उघडकीमुळे कुसुमसुद्धा थक्क होते.

दरम्यान, मधु भाऊ अजूनही कोमात आहेत. नागराज यावेळी स्वतःवरील संशय दूर करण्यासाठी बायको सुमनला सोबत घेऊन चौकशीसाठी येतो. पण त्याच्या मनात मात्र वेगळीच योजना असते. अर्जुन हॉस्पिटलला नसल्याचं समजताच नागराजला पुन्हा मधु भाऊंवर प्राणघातक वार करण्याची संधी मिळाल्याचा भास होतो. मात्र, महिपत त्याला तातडीने बोलावून घेतो आणि त्याच्या कारस्थानांना आवर घालतो. Tharala Tar Mag 20 Aug

हे पण वाचा:‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होणार? निर्माती Suchitra Bandekar यांचं भावनिक वक्तव्य

दुसरीकडे, आश्रम प्रकरणात अडकलेल्या प्रियांना न्याय मिळवण्यासाठी अश्विन आटापिटा करतो. तो एका वकिलाला भेटतो, पण तो वकील ही केस लढण्यास नकार देतो. कारण ही केस संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेली असून, रविराज किल्लेदारसारख्या वरिष्ठ वकिलांनीही हात झटकले आहेत. वकिलाचा युक्तिवाद असतो की, ही केस घेतल्याने त्याच्या नावावर डाग लागेल. अश्विन त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे त्याच्याकडे निराशा येते.

जिथे अश्विन निराश होतो, तिथे महिपत आपल्या पैशांच्या जोरावर एक नवा वकील मिळवतो. तब्बल दोन कोटींच्या मोबदल्यावर तो वकील केस पुन्हा उघडण्यास आणि साक्षीला जामिनावर सोडवण्यास तयार होतो. महिपतला वाटतं की या पावलामुळे तो पुन्हा परिस्थिती आपल्या बाजूने वळवू शकेल. मात्र, नागराज त्याला खात्री देतो की मधु भाऊंवरील अर्धवट हल्ल्याची जबाबदारी तो स्वतः उचलणार आहे. Tharala Tar Mag 20 Aug

एकीकडे अर्जुनला सायलीच्या आई-वडिलांविषयी नवा धागा लागतो, तर दुसरीकडे आश्रम प्रकरणात पुन्हा एकदा खळबळ उडते. महिपत, नागराज आणि अश्विन यांच्यातील संघर्ष आता आणखी तीव्र होणार आहे. “ठरलं तर मग” मालिकेत या सर्व घडामोडींमुळे प्रेक्षकांसमोर नाट्यमय वळण उभं राहतंय.