Tharala Tar Mag 22 Aug : ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत प्रत्येक भागात नवे वळण समोर येत आहे. आजच्या भागात प्रिया जेलमध्ये असताना अचानक चक्कर येऊन कोसळते. ही घटना पाहून अश्विन पूर्णपणे हादरतो. तो पोलिसांना आदेश देतो की प्रियाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावं. साक्षीला मात्र प्रियाचं हे वागणं फारसं पटत नाही. “ही फक्त नाटकं करत आहे, जेलमधून बाहेर पडायचंय म्हणून हा सगळा प्रकार सुरू आहे,” असा संशय ती व्यक्त करते.
दुसरीकडे अर्जुनची डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट असते – आई कल्पना आणि सायली यांना एकत्र आणायचं. यासाठी तो प्रताप आणि अस्मिताला बोलावतो. त्यांचा प्लॅन असा की, सगळे मिळून सायलीला टोचून बोलतील, तिच्याशी उगाच वाईट वागतील. कारण कल्पनाला स्वतःशिवाय कुणी सायलीवर अन्याय करताना सहन होणार नाही, आणि त्यामुळे हळूहळू तिचं मन सायलीकडे वळेल.
प्रतापला सुरुवातीला हा विचार पटत नाही, पण अर्जुनचं लॉजिक ऐकून तो तयार होतो. मात्र, त्याला वाटतं की सायलीला सगळं सत्य सांगून विश्वासात घ्यायला हवं. पण अर्जुन याला ठामपणे नकार देतो. अस्मिताही अखेरीस या प्लॅनमध्ये सहभागी होते. Tharala Tar Mag 22 Aug
दरम्यान, प्रतापच्या सूचनेनुसार प्रतिमालाही या मिशनमध्ये सामील करण्याचं ठरतं. अर्जुन लगेच तिला फोन करून घरी बोलावतो. प्रतिमा आल्यावर अर्जुन-प्रताप- अस्मिता मिळून सायलीला खोटं-खोटं टोमणे मारू लागतात. अस्मिता तर सायलीला खोटारडी म्हणते. हे ऐकताच कल्पनाला मात्र संताप येतो. ती अस्मितालाच सुनावते. इथेच अर्जुनचा प्लॅन काम करताना दिसतो.
सायलीच्या डोळ्यांत मात्र अश्रू येतात. तिच्या मनाला दुखावलं जातं, पण तरीही ती समजूतदारपणे शांत राहते. प्रतिमा सगळ्यांना थोडं थांबवते आणि सायलीच्या बाजूने उभी राहते.
जेलमध्ये प्रियाच्या नाटकामुळे तणाव वाढलेला असतो. अश्विन मोठ्या आवाजात सांगतो, “माझ्या बायकोला काही झालं तर मी सगळं प्रकरण मीडियामध्ये नेईन.” त्याच्या या इशाऱ्यामुळे पोलीस अधिकारीही सावध होतात. दुसरीकडे घरात मात्र अर्जुनचा ‘मिशन मम्मा’ जोरात सुरू आहे. Tharala Tar Mag 22 Aug
आता खरी उत्सुकता आहे ती, अर्जुनचा प्लॅन यशस्वी होईल का? कल्पना आणि सायलीमध्ये खरंच जवळीक वाढेल का? प्रिया खरंच आजारी आहे की फक्त नाटक करतेय? Tharala Tar Mag मालिकेतील हे नवे वळण प्रेक्षकांसाठी नक्कीच धक्कादायक ठरणार आहे.









