‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ ही सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची आवडती ठरली आहे. सूर्यादादा आणि त्याच्या बहिणींच्या प्रेमळ नात्याने ही मालिका घराघरात पोहोचली. तसेच, सूर्या आणि तुळजाची जोडीदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील विविध पात्रांनी आपल्या अभिनयाने आणि कथानकाच्या प्रवाहाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे.
आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याची चर्चा आहे. नुकताच झी मराठीने या मालिकेचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात धक्कादायक घडामोडी उलगडताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये धनश्री देवीसमोर हात जोडून उभी राहून प्रार्थना करताना दिसते. ती म्हणते, “देवीआई, माझं लग्न झालं नाही तरी चालेल, पण दादाला थांबव.” या संवादाने मालिकेत पुढे काहीतरी गंभीर घटना घडणार असल्याची स्पष्ट झलक मिळते.
या प्रोमोमध्ये पुढे सूर्यादादा देवीचे कठीण व्रत करणार असल्याचे उघड होते. सूर्याच्या बहिणींमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होते. राजश्री आपली भीती व्यक्त करत म्हणते, “आजपर्यंत कोणीच हे व्रत पूर्ण करू शकले नाही.” तेजूही काळजी व्यक्त करत म्हणते, “म्हणूनच आम्हाला दादाबरोबरच तुझीही काळजी वाटते.” भाग्या देखील चिंता व्यक्त करते की, “कारण-सगळा त्रास तुलाच होणार आहे.” Lakhat Ek Amcha Dada today episode
या प्रसंगी तुळजा आपल्या बहिणींना समजावत म्हणते, “तुम्ही काळजी करू नका. सूर्या हे व्रत व्यवस्थित पार पाडेल.” या प्रोमोमध्ये डॅडी देखील एका संवादाद्वारे गोष्टींमध्ये रहस्य निर्माण करतो. तो म्हणतो, “आणि कुठं काय कमी पडलंच तर पार पाडायला हा जालिंदर आहेच की,” असे म्हणत डॅडी मिश्कील हसताना दिसतो.
या प्रोमोसोबत झी मराठीने कॅप्शनमध्ये विचारले आहे, “देवीआईचं खडतर व्रत निर्विघ्नपणे पार पाडू शकेल सूर्या?” त्यामुळे हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालणारा ठरत आहे.
सूर्यादादाचा लूकही या प्रोमोमध्ये लक्ष वेधून घेतो. गळ्यात माळा, चेहऱ्यावर रागीट भाव आणि डोळ्यांत वेगळी चमक अशा लुकमुळे सूर्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सुर्यादादाचा आपल्या बहिणींवर जीवापाड प्रेम आहे. त्यांच्या आईच्या निधनानंतर सुर्यादादाने त्यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. बहिणींच्या शिक्षणापासून त्यांच्या लग्नापर्यंतची जबाबदारी त्याने निभावली आहे. नुकताच धनश्रीच्या लग्नात अडथळा आल्याने कुटुंबावर नाराजीचे सावट पसरले आहे.
या कठीण प्रसंगावर मात करण्यासाठी सूर्यादादा देवीचे कठोर व्रत करणार आहे. आता हे व्रत सूर्यादादा पूर्ण करू शकेल का? डॅडी आपल्या डावपेचांनी सूर्याला किती त्रास देणार? या सर्व घटनांचा उलगडा येत्या भागांमध्ये होणार आहे. Lakhat Ek Amcha Dada full episode.
प्रोमो समोर आल्यानंतर मालिकेबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. काही प्रेक्षकांनी प्रोमो पाहून ही मालिका हिंदी चित्रपट ‘पुष्पा’ ची नक्कल असल्याची टीका केली आहे. सोशल मीडियावर काहींनी कमेंट करत लिहिलं की, “सूर्या दादा पुष्पा झालाय,” तर काहींनी लिहिलं की, “सगळं मुव्हीमधलं दाखवलं आहे,” अशी टीका केली आहे.
मात्र, मालिकेतील हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांना कितपत आवडतो आणि सूर्यादादा त्याच्या कठीण व्रतामधून यशस्वी होतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका आता रोज संध्याकाळी ६.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.