‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन जिंकत सर्वांच्या मनात घर करणारा सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण, त्याने नुकताच आपल्या स्वप्नातील नव्या घरात गृहप्रवेश करत खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला. Suraj Chavan Home हा शब्द सोशल मीडियावर अक्षरशः ट्रेंड होताना दिसत आहे. लग्नाआधीच आपल्या नवीन घरात प्रवेश करून सूरजने आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
बारामती तालुक्यातील मोढवे या छोट्याशा गावातून पुढे आलेल्या सूरजच्या जीवनप्रवासात हा क्षण अत्यंत खास मानला जात आहे. रीलस्टार म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर तो कायम भाड्याच्या जागेत राहत असल्याची चर्चा होती. ‘बिग बॉस मराठी’मध्ये असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला स्वतःचं घर मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. वर्षभराच्या आत त्याचं नवीन घर पूर्णत्वाला आलं आणि सूरजने आपल्या बहिणीं सोबत त्याचा शुभ गृहप्रवेश पार पाडला.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत त्याच्या नव्या बंगल्याची भव्यता खुलून दिसते. प्रशस्त हॉल, नीटनेटके मॉड्युलर किचन, आकर्षक रंगसंगती आणि आधुनिक इंटिरियरमुळे Suraj Chavan Home हे चाहते वारंवार पाहत आहेत. घरातील प्रत्येक खोली व्यवस्थित आखून बनवल्याचे स्पष्टपणे जाणवतं. साधेपणातही उठावदार भव्यता दाखवणारा हा बंगला सूरजच्या मेहनतीचा आणि सातत्याचा परिणाम असल्याचं नेटिझन्स सांगताना दिसत आहेत.
या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “आज एक गरीब मुलगा आपला हक्काचा बंगला मिळवतोय”, “शून्यातून उभा केलेला प्रवास आज पूर्ण झाला”, “सूरज भाऊ, खरंच अभिमान वाटतो”, अशा हजारो कमेंट्स त्याच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत. अनेकांनी अजित पवार, कुटुंबीय आणि चाहत्यांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याचंही म्हटलं आहे.
दरम्यान, सूरज चव्हाणच्या आयुष्यात आणखी एक आनंदाचा क्षण अवतरणार आहे. तो लवकरच संजनाशी लग्नगाठ बांधणार आहे. २९ नोव्हेंबरला विवाहसोहळा होणार असून २८ नोव्हेंबरपासून विधींची सुरुवात होईल. जेजुरीजवळील सासवड येथे हा समारंभ पार पडणार आहे. दोन्ही कुटुंबीय तयारीत गुंतले असून चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे. सूरजच्या नव्या घराचा गृहप्रवेश आणि त्याचा आगामी विवाह—हे दोन्ही क्षण त्याच्या आयुष्यातील नवे पर्व ठरणार आहेत. त्याच्या नव्या सुरुवातीसाठी चाहते आणि सहकारी मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा देताना दिसत आहेत.
हे पण पहा:सात जन्मांची साथ! मेघन जाधव आणि अनुष्का पिंपूटकर यांनी बांधली लग्नगाठ; थाटामाटात पार पडला सोहळा







