ग्रोक 3 च्या मदतीने आता वापरकर्ते विनामूल्य studio ghibli style ai images तयार करू शकतात, ChatGPT सदस्यत्वाची गरज नाही.
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड चांगलाच गाजत आहे – आपल्या प्रत्यक्ष फोटोंना जपानी अॅनिमेशनप्रमाणे, studio ghibli style ai images रूपांतरित करणे. हे अॅनिमेटेड आर्टवर्क अगदी स्वप्नवत वाटणाऱ्या रंगछटांसह आणि नाजूक तपशीलांसह साकारले जात असल्याने लोक याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत.
विशेष म्हणजे, हे तयार करण्यासाठी OpenAI च्या ChatGPT-4o चा नवा इमेज जनरेशन फिचर आणि Elon Musk च्या xAI कंपनीचा Grok 3 हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
Grok 3 च्या मदतीने studio ghibli style ai images तयार करा
OpenAI च्या ChatGPT मध्ये हे फिचर आणण्यात आले असले तरी, त्याचा विनामूल्य वापर करण्यासाठी मर्यादा आहेत. त्यामुळे, ज्यांना ChatGPT ची सशुल्क सदस्यता (Subscription) घ्यायची नसेल, त्यांच्यासाठी Grok 3 हा उत्तम पर्याय आहे. Grok 3 हे xAI चे AI Chatbot असून, X म्हणजे (माजी ट्विटर) अॅपमधून ही सहज वापरता येते.
या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आपला फोटो अपलोड करून “studio ghibli style ai images” असा आदेश (Prompt) दिल्यास, Grok तो फोटो Studio Ghibli च्या विशिष्ट अॅनिमेशन style मध्ये बदलून देते. यात सौम्य आणि नाजूक रंगसंगती, जलरंगासारखा पोत, तसेच एक जपानी अॅनिमेशन चित्रपटा सारखा दृश्य परिणाम पाहायला मिळतो. फोटो मिळाल्यावर जर तुम्हाला काही बदल करायचे असतील, तर (Edit) ची सुविधाही Grok मध्ये दिली आहे.
हे पण वाचा ..epfo pf withdrawal atm upi epfo सदस्यांसाठी मोठी खुशखबर! आता UPI आणि ATM द्वारे PF त्वरित काढता येणार
ChatGPT च्या मदतीने फ्रीमध्ये studio ghibli style ai images कसा तयार कराल?
OpenAI च्या ChatGPT-4o मध्ये आता हे इमेज जनरेशन फिचर सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे. अगोदर हे केवळ प्रीमियम युजर्ससाठी उपलब्ध होतं, पण आता मोफत वापरकर्त्यांनाही दररोज तीन प्रतिमा तयार करण्याची संधी यामध्ये मिळणार आहे.
युजर्सना आपले फोटो अपलोड करून त्यावर “Turn this image into a Studio Ghibli-style artwork” किंवा “Ghiblify this” किंवा studio ghibli style ai images असे लिहून आदेश द्यावा लागतो. काही सेकंदांतच OpenAI चा इमेज जनरेटर फोटोला घिबली ( Ghibli ) अॅनिमेशनप्रमाणे बदलून देतो. हा ट्रेंड एवढा गाजत आहे की, OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनीदेखील आपल्या X (ट्विटर) प्रोफाईल फोटोसाठी Ghibli-style Image वापरली आहे.

Ghibli-style artwork इतके लोकप्रिय का?
Studio Ghibli ही १९८५ मध्ये प्रसिद्ध जपानी अॅनिमेटर हायाओ मियाझाकी, इसाओ ताकाहाता आणि तोशियो सुझुकी यांनी स्थापन केलेली कंपनी आहे. पारंपरिक हाताने काढलेल्या अॅनिमेशनचा साज आणि उत्कृष्ठ कथानक हे त्यांच्या चित्रपटांचे खास वैशिष्ट्य आहे.
“स्पिरिटेड अवे,” “हाऊल्स मूव्हिंग कॅसल,” “किकी’ज डिलिव्हरी सर्व्हिस” आणि “प्रिंसेस मोनोनोके” यांसारखे त्यांचे चित्रपट जगभर गाजले. या अॅनिमेशनमध्ये मृदू आणि स्वप्नवत रंगछटा, निसर्गप्रधान पार्श्वभूमी आणि भावनिक खोली असते, ज्यामुळे ही शैली अत्यंत वेगळी आणि मोहक वाटते.
ट्रेंडमागील वाद – एआय कला की कॉपी?
AI च्या मदतीने Ghibli-style artwork Image तयार करण्याच्या ट्रेंडला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असली तरी, काही तज्ञ आणि मूळ अॅनिमेशन प्रेमींनी त्यावर टीकाही केली आहे. Studio Ghibli चे संस्थापक हायाओ मियाझाकी यांनी याआधीच AI निर्मित कलाकृतींवर नाराजी व्यक्त केली होती. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, मशीनने तयार केलेली कला ही मानवी सर्जनशीलतेचा अपमान असल्यासारखी वाटते.
मियाझाकी यांच्या जुन्या प्रतिक्रियांना उजाळा देत काही चाहत्यांनी या AI ट्रेंडला विरोध दर्शवला आहे. “याला कला म्हणता येणार नाही, हे केवळ अल्गोरिदमद्वारे आधीच्या कलाकृतींची कॉपी आहे” असे मत अनेकांनी व्यक्त केले.
नेटिझन्सच्या प्रतिक्रियांमुळे OpenAI चे सर्व्हर तणावाखाली
नवा ट्रेंड एवढा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे की, OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी एका पोस्टमध्ये सांगितले की, “GPU literally melting” म्हणजेच OpenAI चे सर्व्हर या मोठ्या वापरामुळे तणावाखाली आले आहेत. त्यामुळे त्यांनी तात्पुरती प्रतिमा निर्माण करण्यावर मर्यादा (Rate limits) आणण्याचा निर्णय घेतला आहे.
studio ghibli style ai images – भविष्यात काय?
AI च्या मदतीने कला साकारण्याचा हा ट्रेंड अजून किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. काही जण याला आव्हान म्हणून पाहत आहेत, तर काही जण ही नवी क्रांती मानत आहेत. मात्र, AI निर्मित कलेचा “पारंपरिक हाताने काढलेल्या कलाकृतींशी काहीच संबंध नाही” असा दावा केला जात आहे. त्यामुळे हे फक्त तंत्रज्ञानाचे एक आकर्षक साधन आहे की, भविष्यात पारंपरिक कलाकारांच्या कलेवर याचा परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.