मुलभूत भावना, नाती आणि परंपरांचा सन्मान करणारा एक भव्य सोहळा स्टार प्रवाह वाहिनीने सजवला आहे. Vat pornima mahaepisode येत्या वटपौर्णिमेनिमित्त स्टार प्रवाहवरील १५ नामवंत नायिका एकाच फ्रेममध्ये दिसणार आहेत. हा भाग खास ‘महावटपौर्णिमा’ या शीर्षकाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सध्या त्याचा प्रोमो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
सविस्तर मुद्दे
मराठी टेलिव्हिजन विश्वात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग होत असतात. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मालिकांमध्ये वेळीअवेळी मोठे ट्विस्ट आणले जातात, तर कधी नव्या पात्रांची एंट्री होते. काही वेळा तर दोन किंवा अधिक मालिकांतील कलाकार एकत्र करून ‘महासंगम’च्या भागांद्वारे प्रेक्षकांना खास अनुभव दिला जातो. याच परंपरेत आणखी एक पाऊल टाकत स्टार प्रवाहने ( Star Pravah ) आगामी वटपौर्णिमेच्या निमित्ताने १५ नायिकांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे.
स्टार प्रवाह वटपौर्णिमा महाएपिसोड Star Pravah Vat pornima mahaepisode
स्टार प्रवाहकडून नुकताच या विशेष भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील जानकी ही पारंपरिक साजशृंगारात काळ्या मण्यांचा पोते ओवत आहे आणि ती म्हणते, “दरवर्षी जो देत आलाय सौभाग्यवतींना आशीर्वाद…”. त्यानंतर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील काव्या आणि नंदिनी असे म्हणतात, “त्या वडाच्या रक्षणासाठी कोण उठवणार आवाज?” हे संवाद ऐकून प्रेक्षकांमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली आहे.
या प्रोमोमध्ये ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मधील कावेरी सुद्धा झळकते. ती ठामपणे सांगते, “महाराष्ट्राच्या परंपरेचा आहे आम्हाला अभिमान. महाराष्ट्राच्या १५ महानायिका एकत्र येऊन करणार संकटावर मात.” या वाक्यातून संपूर्ण भागाच्या भावनेची झलक मिळते.
कधी पहायला मिळणार
हा विशेष भाग ‘महावटपौर्णिमा’ ( Vat pornima mahaepisode ) ८ जून रोजी स्टार प्रवाहवर दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. परंपरेला आधुनिक रूप देत, संस्कृती आणि नात्यांची बांधिलकी दाखवणारा हा महाएपिसोड असणार आहे.
या भागातील १५ नायिका म्हणजे फक्त मालिकांचे पात्र नसून, त्या मराठी प्रेक्षकांच्या हृदयातील स्थान निर्माण केलेल्या स्त्रिया आहेत. त्यांच्या माध्यमातून एक सशक्त सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या भागात होणार आहे. वडाच्या झाडाभोवती फेर धरताना, पूजन करताना आणि एकत्र संकटांचा सामना करताना या नायिका फक्त परंपरेचे दर्शन घडवत नाहीत, तर स्त्रीशक्तीचा सन्मानही करताना दिसतात. Vat pornima mahaepisode
प्रोमो पाहून प्रेक्षकांनीही सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया भरभरून दिल्या आहेत. अनेकांनी या भागासाठी उत्सुकता व्यक्त केली असून, आपापल्या आवडत्या नायिकेच्या नावाचं समर्थनही कमेंट्समधून केलं आहे.
टीव्ही विश्वात आजवर अनेक महासंगम प्रेक्षकांनी पाहिले असतील, पण एकाच एपिसोडमध्ये १५ नायिका एकत्र येणं ही एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे. त्यामुळे ८ जूनचा हा भाग प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.