स्टार प्रवाहवरील प्रेक्षकप्रिय मालिकांमध्ये नेहमीच नवनवीन वळणे येत असतात. या वेळी मात्र वाहिनीने प्रेक्षकांसाठी एक खास मेजवानी तयार केली आहे. ‘ठरलं तर मग’, ‘थोडं तुझं थोडं माझं’ आणि ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या तीन लोकप्रिय मालिकांचा महासंगम घेऊन वाहिनी ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान येत आहे. या विशेष भागांची वेळ देखील वेगळी असून रात्री ८:३० ते १० वाजेपर्यंत सलग ड्रामा, इमोशन आणि थरार पाहायला मिळणार आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्टार प्रवाह महासंगम प्रोमो’ने चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढवली आहे. दहीहंडीच्या रंगतदार पार्श्वभूमीवर हा महासंगम रंगणार असून अर्जुन, अद्वैत आणि तेजस एकत्र आलेले दिसतात. अर्जुनचा दमदार डायलॉग — “जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा कृष्ण जन्माला येतो” — या प्रसंगाला वेगळाच वजन देतो. तिघे मिळून “गोविंदा रे गोपाळा” असा जयघोष करताच वातावरणात उत्साह पसरतो.
प्रोमोमध्ये मानसी कृष्णाकडे प्रार्थना करताना गायत्री वहिनींचा भूतकाळ आणि प्रभू निवासाबद्दलचा राग उलगडण्याचा निर्धार व्यक्त करते. पण याच वेळी कला आणि सायली थरावर चढून दहीहंडी फोडायला सज्ज होतात. हाच क्षण खरी वळण घेऊन येतो — अद्वैत संपूर्ण रक्ताने माखलेला, गंभीर अवस्थेत अर्जुनसमोर येतो आणि म्हणतो, “मला तुला सायलीच्या आई-बाबांबद्दल काहीतरी सांगायचंय”. हीच वाक्य प्रेक्षकांसाठी सर्वात मोठा हुक ठरते.
या घटनाक्रमातून अद्वैत खरंच सायलीच्या आई-वडिलांबद्दलचं गुपित सांगेल का, की या गोंधळात हे रहस्य आणखी गुंतागुंतीचं होईल, हे पाहणं रोचक ठरणार आहे.
स्टार प्रवाहने सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे. अनेकांनी, “सायलीच्या आई-बाबांचं सत्य ऐकायला आता वाट पाहवत नाही” किंवा “हा एपिसोड धमाल होणार” अशा प्रतिक्रिया दिल्या. चॅनलकडून देखील टॅगलाईन देण्यात आली — “सर्वात मोठा पर्दाफाश, सर्वात मोठं रहस्य, आणि सर्वात मोठं सत्य”.
प्रेक्षकांसाठी हा महासंगम एकाचवेळी तीन कथानकांना नवा ट्विस्ट देणारा ठरणार आहे. दहीहंडीचा जल्लोष, पात्रांमधील गुंतागुंतीच्या भावना आणि भूतकाळातील धक्कादायक सत्य — हे सगळं एकत्र पाहायला मिळणार आहे. ‘स्टार प्रवाह महासंगम प्रोमो’मधून दिसतंय की या एपिसोड्समध्ये नाट्यमयता, रहस्य आणि भावनिक क्षणांचा परिपूर्ण संगम असेल.
११ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रेक्षकांनी टीव्हीसमोर हजर राहून या थरारक प्रवासाचा अनुभव घ्यायचा आहे.









