sonarika bhadoria garodarapanachi good news : मराठी-हिंदी मालिकांच्या चाहत्यांमध्ये ओळखली जाणारी आणि ‘देवों के देव… महादेव’ मालिकेत देवी पार्वतीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री Sonarika Bhadoria आता खऱ्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. लग्नानंतर दीड वर्षांनी सोनारिकाने गरोदरपणाची घोषणा करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये राजस्थानातील नाहरगढ पॅलेसमध्ये भव्य समारंभात Sonarika Bhadoria हिने विकास पराशरशी लग्न केलं होतं. लग्नानंतर सोशल मीडियावर तिच्या अनेक फोटोंनी चाहत्यांची मनं जिंकली होती. आता पुन्हा एकदा तिच्या इंस्टाग्राम पोस्टने चाहत्यांमध्ये आनंदाची लहर निर्माण केली आहे.
१४ सप्टेंबर रोजी सोनारिकाने इंस्टाग्रामवर पांढऱ्या लेस बॉडीकॉन ड्रेसमधील काही खास फोटो शेअर केले. या छायाचित्रांत ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. “आमचे आतापर्यंतचे सर्वात मोठे साहस” अशा कॅप्शनसह केलेल्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सोनारिका व विकास यांची ओळख जिममध्ये झाली होती. विकास हा सोनारिकाच्या भावाचा मित्र असून, त्याच्याशी सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तिने लग्नाचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत सोनारिकाने सांगितले होते की, “लग्नानंतरही आम्ही एकमेकांशी अगदी आधीसारखेच वागतो, जणू काही नात्यात फारसा फरक पडलेलाच नाही.” तिच्या या candid स्वभावामुळे चाहत्यांमध्ये ती अधिक लोकप्रिय ठरली आहे.
हे पण वाचा.. “दिप्ती भागवतच्या सोबत दिसली एक खास व्यक्ती; पाहताच चाहते म्हणाले – ‘माय तशी लेक!’”
२०११ मध्ये ‘तुम देना साथ मेरा’ या मालिकेतून अभिनयाची सुरुवात केलेल्या Sonarika Bhadoria ला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘देवों के देव… महादेव’ मधील देवी पार्वतीच्या भूमिकेमुळे. तिच्या निरागस रूपाने व अभिनयशैलीमुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
आता ती आई होणार असल्याच्या आनंददायी बातमीमुळे सोनारिका व विकासच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मनोरंजनविश्वातली ही गुडन्यूज सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
हे पण वाचा.. स्पृहा जोशी झाली मावशी; भाच्याचं नाव जाहीर करत खास पोस्ट Spruha Joshi









