ADVERTISEMENT

सावली आई होणार का? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मोठा भावनिक ट्विस्ट

savlyachi janu savli savali new twist : सावळ्याची जणू सावली मालिकेत सावलीच्या आवाजाचं सत्य सर्वांसमोर आल्यानंतर कथानकाला नवी कलाटणी मिळाली आहे. आता सावलीच्या आई होण्याच्या इच्छेमुळे आणि जगन्नाथच्या भविष्यवाणीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
savlyachi janu savli savali new twist

savlyachi janu savli savali new twist : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Savlyachi Janu Savali सध्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात असलेला प्रश्न अखेर सुटला आहे. ताराला मिळालेलं गाण्याचं यश आणि प्रसिद्धी तिच्या आवाजामुळे नसून सावलीच्या आवाजामुळे होती, हे सत्य अखेर सर्वांसमोर आलं आहे. विशेष म्हणजे हे सत्य उघडकीस आणण्याचं धाडस सारंगने केलं आणि सावलीला तिची खरी ओळख मिळवून दिली.

या घटनेनंतर भैरवी आणि ताराचा खोटेपणा उघडा पडला. भैरवीने स्वतःची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी वर्षानुवर्षे सावलीच्या आवाजाचा वापर केला होता. केवळ आवाजच नाही, तर सावलीचा मानसिक छळही तिने केला होता. दुसरीकडे, तारालाही गाण्याची आवड नसतानाही तिला जबरदस्तीने गाण्याचं नाटक करायला लावण्यात आलं. या सगळ्या सत्यामुळे भैरवीचा सर्वांसमोर अपमान झाला आणि तिचा खरा चेहरा जगासमोर आला.

सत्य उघड झाल्यानंतर भैरवी जगन्नाथला धमकी देताना दिसते. मात्र यावेळी सावली खंबीरपणे पुढे येते आणि तिच्या कुटुंबाला त्रास देऊ नये, असं स्पष्ट शब्दांत सांगते. या प्रसंगातून सावलीचं धैर्य आणि स्वाभिमान प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळतो. जगन्नाथ सावलीला स्वतःच्या मुलीसारखं मानतो आणि तिच्या प्रत्येक अडचणीत तिच्या पाठीशी उभा राहतो.

आता Savlyachi Janu Savali मालिकेत आणखी एक भावनिक वळण येताना दिसत आहे. जगन्नाथने केलेली भविष्यवाणी कथानकाला वेगळ्याच दिशेने घेऊन जाते. सावली कधीच आई होऊ शकणार नाही, असं तो सारंगला सांगतो. मात्र सावलीला याबाबत काहीच कल्पना नसते. जेव्हा ती सारंगसमोर आई होण्याची इच्छा व्यक्त करते, तेव्हा सारंग अस्वस्थ होतो आणि या विषयावर बोलणं टाळतो.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सारंगची ही घालमेल स्पष्ट दिसते. सावली त्याला थेट विचारते, पण तो उत्तर देण्याऐवजी विषय बदलतो. पुढे सावली जगन्नाथकडे जाऊन सारंगच्या बदललेल्या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त करते. दुसरीकडे, सारंगला मात्र विठ्ठलावर अपार श्रद्धा आहे. पांडुरंगाच्या कृपेने काहीतरी चमत्कार घडेल आणि ही भविष्यवाणी चुकीची ठरेल, अशी त्याची ठाम आशा आहे.

हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 : लावणीवरून घरात ठिणगी, दिपाली सय्यद–राधा पाटील वादामुळे दुसऱ्याच दिवशी रंगत

हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने “सावलीचा विठुराया काही चमत्कार घडवेल का?” अशी भावनिक कॅप्शन दिली आहे. त्यामुळे येत्या भागांमध्ये Savlyachi Janu Savali मालिकेत कोणते नवे वळण येणार, सावलीचं आईपणाचं स्वप्न पूर्ण होणार का, हे पाहणं प्रेक्षकांसाठी अधिकच रंजक ठरणार आहे.

हे पण वाचा.. रोजगारासाठी हमाली, स्वप्नांसाठी बिग बॉस; रोशनची कथा डोळे पाणावणारी

savlyachi janu savli savali new twist