bigg boss marathi 6 roshan bhajankar pravas : बिग बॉस मराठी ६ चा नवा सीझन सुरू होताच घरातील स्पर्धकांबरोबरच त्यांच्या आयुष्याच्या कथा देखील प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. यावर्षी एकूण १७ स्पर्धक बिग बॉसच्या घरात दाखल झाले असून, त्यात विदर्भातून आलेले बॉडी बिल्डर Roshan Bhajankar विशेष लक्ष वेधून घेत आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व जितकं ताकदीचं आहे, तितकीच त्यांची जीवनकहाणी भावूक करणारी आहे.
Roshan Bhajankar यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा छोटासा परिवार असून, उदरनिर्वाहासाठी ते दिवसभर हमालीचं काम करतात. गेल्या काही वर्षांपासून सिमेंटची पोती उचलून ते कुटुंबाचा खर्च भागवतात. विशेष म्हणजे एका सिमेंटच्या पोत्यामागे त्यांना केवळ काही रुपयांचं मानधन मिळतं. अशा परिस्थितीतही त्यांनी कधी हार मानली नाही. दिवसभर कष्टाचं काम करून संध्याकाळी नियमित वर्कआऊट करणं, ही त्यांची दिनचर्या आहे.
या मेहनतीचे व्हिडीओ Roshan Bhajankar सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या साधेपणामुळे आणि ताकदीमुळेच लोकांनी त्यांना ‘विदर्भाचा बॉडी बिल्डर’ अशी ओळख दिली. स्वतःचं हक्काचं घर नसतानाही त्यांनी स्वप्न पाहणं सोडलं नाही. बिग बॉससारख्या मोठ्या मंचावर पोहोचणं हे त्यांच्यासाठी केवळ शो नव्हे, तर आयुष्यातील एक मोठा टप्पा ठरला आहे.
ग्रँड प्रीमियरच्या दिवशी रोशनच्या गावात घरच्यांनी प्रोजेक्टर लावून Bigg Boss Marathi 6 पाहिला. टीव्हीवर नवऱ्याला पाहताच त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेकांनी या कुटुंबाच्या संघर्षाला सलाम केला.
शहरातील आयुष्याचा फारसा अनुभव नसल्यामुळे बिग बॉसचं आलिशान घर Roshan Bhajankar यांना वेगळंच वाटत आहे. घरातील संभाषणं, इंग्रजी शब्दप्रयोग हे त्यांच्यासाठी नवे आहेत. एका प्रसंगात ‘Hi, What’s up guys’ या वाक्याचा अर्थ न समजल्याने त्यांनी सहस्पर्धकाला थेट प्रश्न विचारला, आणि तो क्षण प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला.
हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 : ‘मिशन राशन’ टास्कमध्ये गोंधळ, दिव्या शिंदे बेशुद्ध; प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची धाकधूक
सध्या रोशनच्या पत्नीचा भावूक व्हिडीओ आणि त्यांचा साधेपणा सोशल मीडियावर चर्चेत आहे. “दादाला शेवटपर्यंत साथ द्या”, “सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारा स्पर्धक” अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून उमटत आहेत. Bigg Boss Marathi 6 रोज रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होत असून, Roshan Bhajankar यांचा हा संघर्षमय प्रवास प्रेक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.
हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच दिवशी घरात गोंधळ, पाण्यावरून वाद अन् तन्वी–रुचितामधील जोरदार भांडण









