ADVERTISEMENT

सावळ्याची जणू सावली मालिकेत सावलीच्या आवाजाचं सत्य समोर येताच सारंग भावूक Savlyachi Janu Savali

Savlyachi Janu Savali या लोकप्रिय मालिकेत सावली आणि सारंगच्या नात्याची खरी कसोटी सुरू झाली आहे. सावलीने लपवलेलं तिच्या आवाजाचं सत्य आता सारंगपर्यंत पोहोचतंय का, यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
Savlyachi Janu Savali

झी मराठीवरील Savlyachi Janu Savali ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.  सावलीच्या आयुष्यात संघर्ष नवीन नाही. तिच्या रंग-रूपामुळे तिला अपमान, टोमणे आणि अन्याय सहन करावा लागला. अनेकदा ती निरपराध असतानाही कट-कारस्थानांमुळे दोषी ठरली. मात्र, अशा प्रत्येक क्षणी सारंग तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. तिच्यावर आलेल्या संकटांपासून तिला वाचवण्यासाठी तो नेहमीच पुढे आला.

मात्र, या नात्यात एक मोठं गुपित दडलेलं आहे. सावलीचं गाण्याचं अपार कौशल्य आजपर्यंत सारंगपासून लपलेलं आहे. प्रत्यक्षात जी तारा लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते, त्या यशामागे सावलीचा आवाज आहे. ही गोष्ट सावलीचं कुटुंब, तारा, भैरवी वझे आणि जगन्नाथ यांनाच माहीत आहे. परिस्थितीची मजबुरी आणि भावाच्या उपचारांसाठी सावलीने हे सत्य गिळून ठेवले.

भैरवीने सावलीच्या अडचणीचा फायदा घेत तिच्या आवाजाचा वापर केला. घराण्याचा संगीत वारसा पुढे नेण्यासाठी तिने सावलीला तारासाठी गाणं गाण्यास भाग पाडलं. लग्नानंतरही सावली हेच करत राहिली, पण सासरच्या कोणालाही याची कल्पना दिली नाही. हेच गुपित आता कथेत निर्णायक वळण आणताना दिसत आहे.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या Savlyachi Janu Savali च्या प्रोमोमध्ये सावली सारंगच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेली असते, तिच्या डोक्यावर हात ठेऊन सारंग विचार करत असतो, तो मनात बोलतो सावली तू तुझ्या स्वभावाने माझा मन जिंकले पण मी कुठ कमी पडलो, तू तुझ्या आवाजाची खरी ओळख मला सांगू शकली नाहीस. मनात हा विचार करत असताना, सारंगच्या डोळ्यात पाणी येते, त्याच्या डोळ्यांतील पाणी सावलीच्या गालावर पडते. ती त्याला खुणवत काय झालं विचारते, त्यावेळी तो मान हलवून काही नाही असे बोलतो. त्यानंतर सावली मनातल्या मनात म्हणते, “सारंग सर, माझ्या मनातील कोंडी शब्दात कशी सांगू? विठूराया, माझी खरी ओळख सारंग सरांना सांगण्याची ताकद दे.”

आता हे गुपित उघड झालं, तर सावली-सारंगचं नातं कोणत्या वळणावर जाईल, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. Savlyachi Janu Savali मध्ये येणारा हा भावनिक ट्विस्ट मालिकेला आणखी रंगतदार बनवणार, यात शंका नाही.

भर कार्यक्रमात कार्तिकी गायकवाडचा जादुई स्वर; स्टार प्रवाह मालिकेचं शीर्षकगीत ठरलं सोशल मीडियावर सुपरहिट