झी मराठीवरील ‘सावल्याची जणू सावली’ ( Savalyachi Janu Savali ) ही मालिका सुरुवातीपासूनच तिच्या वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या या मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय. ताराचं तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून देण्यासाठी तिची आई भैरवी कटाक्षानं प्रयत्न करत आहे. पण आता या सगळ्यात सावलीचं नवे रूप, तिची धाडसी भूमिका आणि सोहमची साथ प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे.
अलीकडेच झी मराठीने सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला असून, त्यात ताराच्या हळदीचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. तारा आपल्या प्रियकर सोहमला फोन करून स्पष्ट शब्दांत सांगते – “आज जर म्हात्रेंची उष्टी हळद माझ्या अंगाला लागली, तर मी माझं आयुष्य संपवीन.” या भावनिक उद्रेकानंतर सावली सोहमकडे धाव घेते. सावलीकडे यावर उपाय आहे का, असा प्रश्न विचारला जातो आणि त्यावर ती उत्तर देते – “प्लॅन नाही, पण प्लॅन करणारा माणूस माहित आहे.”
Savalyachi Janu Savali सावली घेणार जोगतिणीच रूप
यानंतर मालिकेत सावलीचा एक वेगळाच अवतार प्रेक्षकांसमोर येतो – ती जोगतिणीच्या रूपात ताराच्या हळदीच्या समारंभात हजेरी लावते. तिच्या आगमनाने तिथे नाट्यमय वातावरण निर्माण होतं. ती अग्निकुंडात काहीतरी टाकते आणि अचानक धुराचं वातावरण तयार होतं. सर्वत्र गोंधळ उडतो. धुरामुळे लोकांना काहीच दिसत नाही. या गोंधळाचा फायदा घेत सावली आणि सोहम ताराला तिथून पळवून नेतात. Savalyachi Janu Savali
प्रोमोच्या शेवटी झी मराठीने दिलेल्या कॅप्शनमधून स्पष्ट होतं की, सावली नव्या रूपात ताराच्या मदतीसाठी धाव घेत आहे. यामुळे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उसळल्या आहेत. काहींनी सावलीच्या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी तिनं तारासाठी जे केलं त्याची जाणीव तारानं ठेवावी, असं मत व्यक्त केलं आहे. एक नेटकरी म्हणतो, “सावली इतकी मोठी मदत करत आहे, पण तारा मात्र तिचाही अपमान करत आहे.” तर दुसरा म्हणतो, “सावली जोगतिणीच्या रूपात फार सुंदर दिसतेय.”
या मालिकेत सोहम आणि तारामधील प्रेम हळूहळू खुलत असताना, भैरवीचं हट्टाने तिचं लग्न दुसऱ्याच मुलाशी लावण्याचा प्रयत्न या दोघांवर मोठं संकट बनून उभा राहिला आहे. काही दिवसांपूर्वी सोहमने तिलोत्तमाला आपलं प्रेम सांगितलं होतं आणि तिने हे स्थळ भैरवीसमोर मांडलं होतं. मात्र, भैरवीने साफ नकार दिला होता. त्यामुळे सावली आता या प्रेमप्रकरणात नायक बनून समोर आली आहे.
१५ नायिका एकत्र, स्टार प्रवाहवर सगळ्या मालिकांचा वटपौर्णिमेचा महाएपिसोड Vat pornima mahaepisode
सावली ही गरीब कुटुंबातील मुलगी असून तिच्या लहान भावाचं आजारपण आणि आर्थिक तंगीमुळे भैरवीने तिच्या आवाजाचा सौदा केला आहे. सावली गाते, पण त्या गाण्याचा क्रेडिट ताराला मिळतो. जगाला वाटतं की, ताराच गाते; पण प्रत्यक्षात ती सावलीचा आवाज असतो. भैरवीने तिच्या घरासाठी पैशांची हमी दिल्यामुळे सावलीकडून हे सगळं करवून घेतलं जात आहे.
मात्र, सावलीचं मन मात्र अजूनही प्रामाणिक आहे. ती तारासाठी मदतीला धावते, तिचं प्रेम वाचवण्यासाठी जोगतिणीचं रूप घेत ती सज्ज होते. तिचा हा धाडसी निर्णय मालिकेच्या कथानकाला नवे वळण देतो.
प्रेक्षक आता एका गोष्टीकडे अधिकच उत्सुकतेने पाहत आहेत – सावलीच्या मदतीने सोहम आणि ताराचं प्रेम यशस्वी होणार का? भैरवीच्या हट्टाला धक्का बसणार का? या सगळ्याची उत्तरं येणाऱ्या भागांमध्ये मिळणार आहेत.