ADVERTISEMENT

सासू–सुनांची खास सहल! शिवानी रांगोळे सासूबाई मृणाल कुलकर्णीसोबत गेली बालीला

Shivani Rangole Bali Trip अभिनेत्री शिवानी रांगोळे आपल्या सासूबाई मृणाल कुलकर्णीसोबत पहिल्यांदाच इंटरनॅशनल ट्रिपला निघाल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. दोघी सध्या बालीतील निसर्गसौंदर्याचा आनंद घेत असून, शिवानीने शेअर केलेल्या खास व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
Shivani Rangole Mrinal Kulkarni Trip

Shivani Rangole: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचं नातं नेहमीच चाहत्यांना आकर्षित करत आलं आहे. सासू–सुनेपेक्षा अधिक मैत्रीपूर्ण जुळलेलं हे नातं अनेकांसाठी आदर्श मानलं जातं. घरगुती वातावरणातही दोघींची ट्युनिंग उत्तम असल्याचं अनेकवेळा दिसून आलं आहे. विराजस कुलकर्णीशी लग्नानंतर शिवानीला ‘सून’ म्हणून नव्हे तर ‘मुलगी’ म्हणून घरात घेतल्याचं मृणाल कुलकर्णी अनेक मुलाखतींमध्ये सांगताना दिसतात.

या खास नात्यातील आणखी एक गोड क्षण आता चाहत्यांसमोर आला आहे. शिवानी रांगोळे आणि तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच एकत्र इंटरनॅशनल ट्रिपची मजा घेतली असून, त्यासाठी दोघींनी इंडोनेशियातील बालीची निवड केली आहे. विदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरलेलं बाली हे बेट आपल्या निसर्गरम्य वातावरणासाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. शिवानीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे त्यांच्या या सहलीची झलक चाहत्यांसमोर आली आहे.

शिवानीच्या व्हिडिओमध्ये बालीतील रंगीबेरंगी बाजारपेठा, स्थानिक कलाकृती, युनिक फॅशन आयटेम्स आणि तिथलं सुंदर नैसर्गिक वातावरण दिसून येतं. शिवानीने तिच्या सासूबाईंसोबतचे काही गोड क्षण कैद करत ‘माझ्या लाडक्या सासूबाईंबरोबर पहिली ट्रिप’ असं लिहिलं आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी “किती सुंदर नातं”, “बाली ट्रिप सासूबाईंसोबत मस्तच” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पर्यटकांनी बालीला गेल्यावर ‘बाली स्विंग’चा आनंद घेतल्याचं आपण पाहतो, आणि शिवानी—मृणाल यांनीही हा अनुभव घेतल्याचे काही क्षण व्हिडिओत दिसतात. दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह चाहत्यांच्या मनात विशेष स्थान मिळवतो.

मालेगाव चिमुकली प्रकरणावर अभिज्ञा भावेचा संताप; “लक्षात ठेवा हा नराधम…” म्हणत व्यक्त केली तिखट प्रतिक्रिया

दरम्यान, शिवानी रांगोळे (  Shivani Rangole ) सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. ती लवकरच ‘शंकर जयकिशन’ या नाटकातून रंगभूमीवर झळकणार आहे. या नाटकात तिच्यासोबत भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांसारखे दिग्गज कलाकारही दिसणार आहेत. विराजस कुलकर्णीने लिहिलेलं आणि सुरज पारसनीस दिग्दर्शित केलेलं हे नाटक लवकरच रसिकांसमोर येणार आहे.