Samsung Galaxy S26 Ultra या नवीन स्मार्टफोन मध्ये बॅटरीच्या संदर्भात युजर्सना मोठ अपग्रेड पाहायला मिळणार असून,या स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग मिळणार आहे.या नव्या मॉडेलमध्ये अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
सतत Samsung कंपनी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये नेहमीच नवीन सुधारणा करत असतात आणि आता Samsung Galaxy S26 Ultra या त्यांच्या स्मार्टफोन मध्ये 7000mAh बॅटरी अपग्रेड करण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. रिपोर्ट्सनुसार, आपल्याला या स्मार्टफोन मध्ये 7000mAh ची बॅटरी प्लस 65W फास्ट चार्जिंग मिळू शकते.Samsung चे हे अपग्रेशन खरे ठरले, तर हा Samsung कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा बॅटरी अपग्रेड असू शकतो.
सॅमसंगने काही दिवसांपूर्वी Galaxy S25 सीरिज ही जागतिक बाजारात सादर केली होती, या स्मार्टफोन मध्ये कंपनीने डिझाइन आणि प्रोसेसरमध्ये मोठे बदल केला होता. आता, Samsung Galaxy S26 Ultra हा पुढील वर्षात जानेवारी महिन्यात लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या येणाऱ्या नवीन स्मार्टफोन संदर्भात अनेक लीक समोर आले आहेत.त्यामध्ये असे सांगितले जात आहे, यावेळी Samsung कंपनी बॅटरी मध्ये मोठा बदल करू शकते. काही रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की Samsung Galaxy S26 Ultra स्मार्टफोनमध्ये सिलिकॉन-कार्बन बॅटरी वापरण्यात येणार आहे, कारण ती लिथियम-आयन बॅटरीपेक्षा जास्त कार्यक्षम असेल.
✔ 7000mAh ची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर दीर्घकाळ चालणारी बॅटरी आहे.
✔ काही मिनिटांत फोन चार्ज करण्यासाठी 65W फास्ट चार्जिंग सुविधा.
✔ हलकी आणि अधिक ऊर्जा कार्यक्षमता, कमी जागा घेणारी सिलिकॉन-कार्बन बॅटरी.
जर का ही माहिती खरी ठरली, तर Samsung कंपनीसाठी जागतिक बाजारपेठेत मोठी संधी मिळेल, कारण या प्रकारच्या बॅटरी आतापर्यंत आपल्याला केवळ काही प्रीमियम ब्रँड मध्येचं पाहायला मिळाल्या होत्या.
हे पण वाचा ..भारतात मोटरसायकलच्या किमतीत या कंपनीने काढली स्वस्त इलेक्ट्रिक कार Ligier Mini EV एका चार्जवर 200 किमी धावणार
Samsung Galaxy S26 Ultra या स्मार्टफोन संदर्भात अजून अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी काही रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन 2026 मध्ये पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीत लाँच करण्यात येऊ शकतो.
सॅमसंग दरवर्षीच जानेवारी महिन्यातच S सीरिजचे नवीन मॉडेल्स युजर्ससाठी सादर करत असतो. त्याचमुळे Galaxy S26 Ultra सोबत Galaxy S26 आणि Galaxy S26+ हे दोन मॉडेल्स देखील युजर्ससाठी लाॅन्च होण्याची शक्यता आहे.
आजकालच्या युजर्सना अधिक बॅटरी बॅकअप हवा आहे, कारण त्यांना वारंवार फोन चार्जिंग करण्याची गरज पडू नये.तसेच बहुतेक युजर्सना गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी मोठ्या बॅटरीची आवश्यकता असते. त्यामुळे सध्याचा ग्राहक बॅटरी जास्त काळ टिकून राहणाऱ्या स्मार्ट फोनला प्राधान्य देत आहे आणि त्याचीच मागणी करत आहेत.
तसेच 7000mAh पेक्षा जास्त क्षमतेच्या बॅटरीसह अनेक चीनी स्मार्टफोन ब्रँड्स आधीच फोन लाँच करत आहेत,आणि या सध्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी Samsung कंपनीला नव्या बॅटरी टेक्नॉलॉजीची गरज भासत आहे.त्याचमुळे की काय Samsung कंपनी सिलिकॉन-कार्बन बॅटरी चा आविष्कार करत आहे कारण ही बॅटरी लिथियम-आयन बॅटरीपेक्षा 10% अधिक ऊर्जा कार्यक्षम आहे.आणि ही बॅटरी वजनाने हलकी असून कमी जागा घेते, त्यामुळे फोनच वजन कमी होईल.
Samsung Galaxy S26 Ultra या स्मार्ट फोनच्या संभाव्य फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर आपल्याला या मध्ये..
📌 डिस्प्ले: 6.8-इंच डायनॅमिक AMOLED 2X
📌 प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 8 Gen 4 / Exynos 2500
📌 कॅमेरा: 200MP प्रायमरी कॅमेरा, 50MP टेलीफोटो लेन्स, 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स
📌 बॅटरी: 7000mAh
📌 चार्जिंग: 65W फास्ट चार्जिंग, वायरलेस चार्जिंग सपोर्ट
📌 ऑपरेटिंग सिस्टम: Android 16 (One UI 7)
इत्यादी सर्व फीचर्स मिळणार असून Samsung Galaxy S26 Ultra ची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नसली तरी देखील, तज्ञांच्या मते, या फोनची किंमत सुमारे ₹1,20,000 असू शकते. या स्मार्टफोन शिवाय, Samsung Galaxy S26 आणि Galaxy S26+ हे दोन मॉडेल्सही वेगवेगळ्या किंमतींमध्ये लाँच केले जाऊ शकतात.
Samsung Galaxy S26 Ultra मध्ये 7000mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग असणार आहे हेच एक मोठे अपग्रेड असेल. आणि हा स्मार्टफोन अधिक बॅटरी बॅकअप व जलद चार्जिंगसह बाजारात उपलब्ध करण्यात येईल, त्यामुळे युजर्सना या स्मार्टफोनचा जबरदस्त अनुभव मिळणार आहे .Samsung कंपनी लवकरच या फोनबद्दल अधिकृत माहिती त्यांच्या वेब साइडवर जाहीर करू शकते.