ADVERTISEMENT

अभिनेत्री साक्षी तंवरने लग्न न करता ४५ व्या वर्षी दत्तक घेतली मुलगी, कधी व्हायचं होतं IAS अधिकारी Sakshi Tanwar

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी तंवर Sakshi Tanwar हिने आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मनं जिंकली. करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला आणि ४५व्या वर्षी एका मुलीला दत्तक घेतलं. पण..
Sakshi Tanwar Daughter

भारतीय दूरचित्रवाणी जगतातील एक अत्यंत लोकप्रिय आणि शांत स्वभावाची अभिनेत्री म्हणजे साक्षी तंवर ( Sakshi Tanwar ). ‘कहानी घर घर की’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण थोड्याच जणांना माहिती आहे की, साक्षीचं सुरुवातीचं स्वप्न अभिनेत्री होण्याचं नव्हतं, तर ती आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहत होती.

राजस्थानमधील अलवर येथे जन्मलेल्या साक्षी तंवरचे वडील राजेंद्रसिंग तंवर हे सीबीआयमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते. शिस्तबद्ध वातावरणात वाढलेली साक्षी अत्यंत अभ्यासू होती. तिने दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर एका पाचतारांकित हॉटेलमध्ये सेल्स ट्रेनी म्हणून करिअरची सुरुवात केली. पण तिच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं, जेव्हा १९९८ साली तिने ‘अलबेला सूर मेला’ या दूरचित्रवाणी कार्यक्रमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.

थोड्याच काळात एकता कपूरच्या प्रसिद्ध मालिकेत ‘कहानी घर घर की’ मधील पार्वती अग्रवाल या भूमिकेने साक्षी घराघरात पोहोचली. तिच्या शांत पण प्रभावी अभिनयामुळे ती प्रेक्षकांची लाडकी बनली. त्यानंतर २०११ ते २०१४ दरम्यान प्रसारित झालेल्या ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेत राम कपूरसमवेत तिच्या ‘प्रिया कपूर’ या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. राम कपूरसोबतचा तिचा दीर्घ रोमँटिक सीन त्या काळी चर्चेचा विषय ठरला होता. Sakshi Tanwar

साक्षीनं ‘कॉफी हाऊस’, ‘आतंकवादी अंकल’, आणि ‘शोर से सुरूआत’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु खऱ्या अर्थानं ती झळकली ती ‘दंगल’ या चित्रपटात. आमिर खानच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या साक्षीने या ब्लॉकबस्टर चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप सोडली.

साधं आणि संयमी आयुष्य जगणारी साक्षी तंवर आजही बॉलिवूडमध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व मानली जाते. तिने कधीच लग्न केलं नाही, पण मातृत्वाचा आनंद अनुभवण्यासाठी २०१८ साली तिने एका बालिकेला दत्तक घेतलं. त्या वेळी तिचं वय ४५ वर्षं होतं. तिच्या मुलीचं नाव दित्या असून, साक्षी आणि दित्या सध्या मुंबईत एकत्र राहतात. करिअरमध्ये मोठं यश मिळवल्यानंतरही साक्षीने कधीही ग्लॅमरच्या आड साधेपण गमावलं नाही. आयुष्यातील प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणारी ही अभिनेत्री आजही प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जाते. Sakshi Tanwar Daughter

टीआरपी क्वीन राखी सावंतची ‘बिग बॉस १९’ मध्ये धमाकेदार पुनरागमनाची चर्चा !