rutuja bagwe replaced from serial due to looks : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आलेल्या संघर्षांबद्दल उघडपणे बोलत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऋतुजाने तिला आलेल्या रिजेक्शनचे आणि मालिकेतून अचानक बाहेर काढण्यात आल्याचे अनुभव सांगितले.
ऋतुजा म्हणाली, “मी करिअरच्या सुरुवातीला अनेक मालिकांसाठी ऑडिशन्स दिल्या. अनेकदा मी फायनल राउंडपर्यंत पोहोचायचे, पण शेवटी नकार मिळायचा. कारण विचारल्यावर उत्तर मिळायचं – काम चांगलं करतेस, पण तू आमच्या दृष्टीने हिरोईन मटेरियल नाहीस. हा शब्द वारंवार ऐकावा लागला.”
तिच्यासाठी सर्वात धक्कादायक प्रसंग तेव्हा आला जेव्हा एका मालिकेत निवड झाल्यानंतर तीन महिन्यांतच तिला रिप्लेस करण्यात आलं. ऋतुजा पुढे सांगते, “मी विचारलं की मला अचानक का काढलं? तर चॅनेलकडून सांगण्यात आलं की तुझ्यामध्ये हिरोईनचे गुण नाहीत, म्हणून तुला बाजूला करावं लागतंय. हा अनुभव माझ्यासाठी खूप कठीण होता.”
तरीही या प्रसंगामुळे ती खचली नाही. तिच्या म्हणण्यानुसार, “आपण मेहनत करत राहायला हवं. रंगमंचावर कधी मला असं कोणी विचारलं नाही की तू कशी दिसतेस. नाटकात फक्त तुझ्या कामाचं महत्त्व असतं.” तिच्या आईनेही तिला सतत प्रोत्साहन दिलं की एक दिवस तू नायिका होशीलच.
नशिबाने, काळ बदलला आणि घरगुती व नैसर्गिक वाटणाऱ्या नायिकांची मागणी निर्माण झाली. त्यावेळी ऋतुजाला एक महत्त्वाची भूमिका मिळाली. सुरुवातीला तिच्यावर दिसण्यावरून टीका झाली, पण काही महिन्यांतच प्रेक्षकांनी तिचं काम ओळखलं आणि स्वीकारलं.
ऋतुजाने मुलाखतीत अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचाही उल्लेख केला. “मुक्ता बर्वेलाही अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं होतं. मग मी विचार केला की आपण कोण आहोत? प्रयत्न करत राहू, एक दिवस यश नक्की मिळेल.”
हे पण वाचा.. डफली वाजवताना अशोक सराफ यांचा व्हिडीओ व्हायरल चाहते म्हणाले.. अशोक मामा..
आज ऋतुजा बागवे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हिंदी मालिकेत काम केल्यानंतर ती म्हणते, “आता मला काही फरक पडत नाही. मी माझं कौशल्य सिद्ध केलं आहे. कोणाला माझं काम आवडत असेल तर त्यांनी मला कास्ट करावं, नसेल तर त्याचंही मला काहीच दुःख नाही.”
ऋतुजाची ही स्पष्टवक्तेपणा आणि जिद्द पाहून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. तिच्या या अनुभवातून मराठी मनोरंजनसृष्टीत यश मिळवण्यासाठी संघर्षाला कसं सामोरं जावं, हे अधोरेखित होतं.
हे पण वाचा.. मोनालिसावर दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने भावुक पोस्ट शेअर केली









