ADVERTISEMENT

डफली वाजवताना अशोक सराफ यांचा व्हिडीओ व्हायरल चाहते म्हणाले.. अशोक मामा..

ashok saraf played tambourine video viral : मराठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा डफली वाजवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
ashok saraf played tambourine video viral

ashok saraf played tambourine video viral : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते अशोक सराफ हे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी अनेक पिढ्यांना हसवलं, रडवलं आणि विचार करायला भाग पाडलं. सध्या ते कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेत ते शिस्तप्रिय, कठोर पण तितकेच प्रेमळ आजोबांच्या भूमिकेत झळकत आहेत. घरातील प्रत्येकावर लक्ष ठेवणारे आणि नातवंडांसाठी सतत काही ना काही करणारे असे त्यांचे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

मात्र अलीकडेच अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते हातात डफली घेऊन ताल धरताना दिसत आहेत. त्यांचा आनंदी चेहरा पाहून चाहत्यांनाही हसू आवरेना. हा व्हिडीओ ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा असल्याचं समजतं. स्वतः सराफ यांनी हा क्षण शेअर केला आणि लगेचच चाहत्यांच्या प्रतिक्रिया ओघाने येऊ लागल्या.

नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “ग्रेट, आमचं लहानपण आनंदी केल्याबद्दल धन्यवाद”, “पूर्वीसारखा तुमचा एखादा सिनेमा पाहायला मिळाला तर आम्ही भाग्यवान ठरू”, “एक नंबर”, “सुपर मामा”, अशा अनेक प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये दिसत आहेत. काहींनी तर हार्ट आणि क्लॅपिंग इमोजी टाकत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

अशोक सराफ यांचा अभिनय प्रवास मराठी सिनेसृष्टीसाठी अमूल्य आहे. ‘अशी ही बनवानबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘माझा पती करोडपती’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर व्यक्तिरेखाही त्यांनी तेवढ्याच ताकदीने साकारल्या आहेत. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांच्या या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हे पण वाचा.. “लहानपणी मला…” अभिनेत्री तितीक्षा तावडेची बहिण  अभिनेत्री खुशबू तावडेसाठी भावनिक पोस्ट

आजही त्यांचा प्रत्येक चित्रपट आणि मालिका प्रेक्षकांमध्ये तेवढ्याच उत्साहाने पाहिली जाते. ‘अशोक मा.मा.’ मालिकेमधून ते घराघरांत पोहोचत असतानाच त्यांच्या या व्हायरल व्हिडीओने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की अशोक सराफ हे खरेच लोकांच्या हृदयात कायमचे घर करून राहिलेले कलाकार आहेत.

आगामी काळात अशोक सराफ आपल्याला त्यांच्या पुन्हा एकदा साडे माडे तीन या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटतील येणार आहेत

हे पण वाचा.. “लग्नाच्या प्रश्नावर जुई गडकरीचं भन्नाट उत्तर; चाहत्यांचं हसू अनावर” काय म्हणाली अभिनेत्री