Reliance Jio च्या प्लान्समध्ये मोठा बदल, Rs 69 आणि Rs 139 संदर्भात जाणून घ्या काय आहेत नवीन फायदे!

Reliance Jio

Reliance Jio ने सध्या आपल्या Rs 69 आणि Rs 139 या दोन प्लान्समध्ये बदल केला आहे.त्यामुळे आता वापरकर्त्यांना मर्यादित कालावधीत डेटा वापरावा लागणार आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Reliance Jio सतत आपल्या युजर्ससाठी नवीन ऑफर्स आणि प्लान्स मध्ये अपडेट आणत असतात. त्यामुळे यावेळेला देखील, Reliance Jio कंपनीने आपल्या युजर्स साठी आपल्या लोकप्रिय डेटा प्लान्समध्ये बदल केला असून, कंपनीने Rs 69 आणि Rs 139 या डेटा प्लान्समध्ये युजर्सना स्टैंडअलोन वैलिडीटी मिळणार आहे.


पूर्वी हे दोन्ही प्लान्स युजर्सच्या बेस प्लानवर अवलंबून होते, म्हणजेच जर तुमच्या बेस प्लानची वैधता 30 दिवसांची असेल, तर हा डेटा अॅड-ऑन प्लान देखील तेवढ्याच कालावधी साठी चालवाय यायचा. पण आता Reliance Jio ने या प्लॅन्समध्ये बदल करत या प्लॅन्ससाठी फक्त 7 दिवसांची वैधता निश्चित केली आहे.

Reliance Jio ने Rs 69 आणि Rs 139 प्लॅन्समध्ये आणि त्याच बरोबर या दोन प्लॅन्सच्या अॅड-ऑन प्लॅन्समध्ये नेमके काय बदल झाले आहेत ते आपण पुढे पाहूया,तर आपल्याला पूर्वी Rs 69 प्लॅनमध्ये 6GB हाय-स्पीड डेटा मिळायचा आणि हा डेटा बेस प्लानच्या वैधतेनुसार चालायचा आणि Rs 139 प्लानमध्ये 12GB हाय-स्पीड डेटा मिळत होता व तो ही बेस प्लानच्या वैधतेनुसार वापरता यायचा, पण आता Rs 69 प्लॅनमध्ये 6GB डेटा मिळेल पण तो फक्त 7 दिवसांसाठी आणि Rs 139 प्लॅनमध्ये 12GB डेटा मिळेल पण तो ही फक्त 7 दिवसांसाठी याचाच अर्थ थोडक्यात असा होतो की, तुम्हाला हा डेटा फक्त एका आठवड्यातच वापरावा लागेल. जर तुम्ही डेटा कमी वापरणारे असाल, तर कदाचित हा बदल तुम्हाला अडचणीचा किंवा नाराज करणारा ठरू शकतो.

या प्लान्समध्ये Reliance Jio ने केलेला बदल युजर्ससाठी मिश्र प्रतिसाद निर्माण करू शकतो. काही लोकांना ही सुविधा अतिशय चांगली वाटेल, पण जे लोक दीर्घकालीन डेटा प्लॅन शोधत होते त्यांच्यासाठी हा बदल फायद्याचा नाही.

हे पण वाचा ..Samsung Galaxy S26 Ultra मध्ये 7000mAh ची बॅटरी आणि 65W ची फास्ट चार्जिंग मिळणार !

Reliance Jio ने Rs 69 आणि Rs 139 डेटा अॅड-ऑन प्लान्स व्यतिरिक्त आणखी काही प्लान्समध्ये बदल केले आहेत,तर Jio ने आपल्या Rs 448 प्लानची किंमत कमी केली असून ती आता Rs 445 केली आहे, त्यामुळे युजर्सना हा प्लॅन आता 3 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.  Jio ने काही दिवसांपूर्वी बंद केलेला Rs 189 प्रीपेड प्लॅन पुन्हा युजर्ससाठी लाँच केला असून हा प्लॅन या आधी jio कडून काढून टाकला गेला होता, परंतु आता jio कंपनीने तो प्लॅन परत युजर्ससाठी उपलब्ध करून दिला आहे.

म्हणजेच, जरी Reliance Jio ने Rs 69 आणि Rs 139 प्लॅन मध्ये बदल केला असला तरी ही, त्यांच्या इतर काही प्लॅन मध्ये Reliance Jio ने युजर्सचा विचार करत चांगले बदलही केलेले दिसतात.

Reliance Jio ने प्लान्समध्ये बदल केले, आणि काही प्लान्समध्ये किंमत ही कमी केली असली तरी, त्यामुळे युजर्सचे मत थोडं मिश्र स्वरूपाचा आहे.

काही युजर्सच म्हणणं आहे की “Jio ने डेटा अॅड-ऑन प्लॅनमध्ये बदल केलेले योग्य नाहीत, कारण त्याचा प्रभाव युजर्सच्या इंटरनेट वापरावर होणार आहे.तर काही युजर्सना Rs 448 प्लानची किंमत 3 रुपये कमी झाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. Rs 189 प्लॅन पुन्हा युजर्ससाठी बाजारात उपलब्ध झाल्याने युजर्स समाधानी आहेत.

Jio प्रीपेड प्लान्स

Jio प्रीपेड प्लान्स

प्लान किंमत (₹)डेटावैलिडिटीअतिरिक्त फायदे
696GB7 दिवसअतिरिक्त 5G डेटा (पात्र वापरकर्त्यांसाठी)
13912GB7 दिवसअनलिमिटेड कॉलिंग
4452GB/दिन28 दिवसOTT अॅप्स मोफत, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS/दिन
1892GB28 दिवसअनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS/दिन

तुम्ही सुद्धा जर फक्त डेटा प्लॅन शोधत असाल, तर हा बदल तुमच्यासाठी थोडा अडचणीचा ठरेल. पण जर तुम्ही Jio चे प्रीपेड प्लॅन्स वापरत असाल, तर Rs 189 प्लान आणि Rs 445 प्लॅन तुमच्यासाठी चांगले पर्याय ठरू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *