realme narzo 80 pro आणि Narzo 80x 5G realme ने भारतात लाँच केली बजेट स्मार्टफोन्सची नवी मालिका.!

realme narzo 80 pro

स्पीड, स्टाइल आणि पॉवरचा परिपूर्ण संगम realme narzo 80 pro सिरीज आता बाजारात

भारतीय स्मार्टफोन बाजारात बजेट आणि मिड-रेंज फोनसाठी प्रसिद्ध असलेली रिअलमी कंपनीने आपल्या Narzo सिरीजखाली दोन नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत—realme narzo 80 pro 5G आणि Realme Narzo 80x 5G. या दोन्ही डिव्हाइसेसची वैशिष्ट्ये, किंमत, डिझाइन आणि परफॉर्मन्स लक्षात घेता, ही मालिका ग्राहकांना उत्तम मूल्य देणारी ठरू शकते.

किंमत आणि उपलब्धता: ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

realme narzo 80 pro 5G ची किंमत 8GB RAM + 128GB स्टोरेजसाठी ₹19,999 पासून सुरू होते, तर 8GB + 256GB व्हेरिएंट ₹21,499 मध्ये आणि 12GB + 256GB व्हेरिएंट ₹23,499 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन Racing Green आणि Speed Silver अशा दोन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे.

दुसरीकडे, Realme Narzo 80x 5G हा फोन 6GB + 128GB साठी ₹13,999 तर 8GB + 128GB व्हेरिएंट ₹14,999 मध्ये मिळतो. Sunlit Gold आणि Deep Ocean या आकर्षक रंगांमध्ये हा डिव्हाइस सादर झाला आहे. दोन्ही स्मार्टफोन Amazon आणि Realme च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहेत.

विशेष म्हणजे, Realme ने जाहीर केले आहे की, realme narzo 80 pro 5G खरेदी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹1,299 पर्यंतचे खास फायदे मिळणार आहेत. याशिवाय, 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 ते मध्यरात्री 12 पर्यंत सुरू होणाऱ्या ‘अर्ली बर्ड सेल’मध्ये Narzo 80 Pro 5G साठी ₹2,000 पर्यंत सूटही दिली जाणार आहे. Narzo 80x 5G चा सेल 11 एप्रिलपासून सुरू होईल.

SpecsRealme Narzo 80x 5GRealme Narzo 80 Pro 5G
Display6.72-inch6.77-inch
Front Camera8-megapixel16-megapixel
Rear Camera50MP + 2MP50MP + 2MP
RAM6GB8GB, 12GB
Storage128GB128GB, 256GB
Battery6000mAh6000mAh
OSAndroid 15Android 15
Resolution1080×2400 pixels1080×2392 pixels

हे पण वाचा ..motorola edge 60 fusion भारतात लॉन्च; दमदार प्रोसेसर, Sony कॅमेरा आणि आकर्षक वैशिष्ट्ये

realme narzo 80 pro 5G – परफॉर्मन्स आणि प्रीमियम अनुभवाचं नवं परिमाण

Narzo 80 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 7400 प्रोसेसरचा समावेश असून याला LPDDR4X RAM (12GB पर्यंत) आणि UFS 3.1 स्टोरेज (256GB पर्यंत) ची जोड आहे. या फोनमध्ये Android 15 आधारित Realme UI 6 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. गेमिंगसाठी यामध्ये 6,050mm² VC कूलिंग सिस्टीम आणि 90fps पर्यंत BGMI गेमिंग सपोर्टदेखील आहे.

डिस्प्लेच्या बाबतीत, या फोनमध्ये 6.77-इंचाचा Full HD+ (1080×2392 pixels) कर्व्ह्ड AMOLED स्क्रीन देण्यात आला आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट, 800 निट्स ब्राइटनेस आणि 3,840Hz PWM डिमिंगसारखी वैशिष्ट्ये आहेत. आय प्रोटेक्शन मोडमुळे डोळ्यांवरचा ताण कमी होतो.

कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा (OIS सपोर्टसह) आणि 2 मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा EIS सपोर्टसह दिला आहे. सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो.

बॅटरी बाबतीत बोलायच झालं तर हा डिव्हाइस 6,000mAh क्षमतेच्या बॅटरीसह येतो. यात 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग आणि 65W रिव्हर्स चार्जिंगसुद्धा दिलं आहे. MIL-STD-810H मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन आणि IP66/IP68/IP69 प्रोटेक्शनमुळे हा फोन पाण्यापासून व धुळीपासून सुरक्षित राहतो.

Narzo 80x 5G – बजेट सेगमेंटमधील दमदार पर्याय

Narzo 80x 5G मध्ये MediaTek Dimensity 6400 चिपसेट देण्यात आला असून याला 8GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजची साथ आहे. यामध्येही Android 15 आधारित Realme UI 6 सॉफ्टवेअर दिलं आहे.

डिस्प्लेच्या बाबतीत, हा फोन 6.72-इंचाच्या फुल-HD+ LCD पॅनलसह येतो. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 690 निट्स पर्यंत ब्राइटनेस आहे. हा स्क्रीन फ्लॅट डिझाइनमध्ये असून 20:09 अशा आस्पेक्ट रेशोमध्ये आहे.

कॅमेरा सेटअपमध्ये 50MP मुख्य सेन्सर, 2MP डेप्थ सेन्सर आणि 8MP फ्रंट कॅमेरा यांचा समावेश आहे. बॅटरी 6,000mAh क्षमतेची असून याला 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. पाण्याचा आणि धुळीचा प्रतिकार करण्यासाठी IP69 रेटिंग देण्यात आले आहे.

फोनची जाडी फक्त 7.94mm असून वजन 197 ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी दोन्ही फोनमध्ये 5G, 4G, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS आणि USB Type-C पोर्ट दिले आहेत.

एकूण मूल्यांकन – कोणता निवडाल?

जर तुम्हाला एक प्रीमियम फील, अधिक ताकदवान प्रोसेसर, AMOLED डिस्प्ले आणि जलद चार्जिंगसह दमदार परफॉर्मन्स हवा असेल तर Narzo 80 Pro 5G हा उत्तम पर्याय आहे. मात्र जर तुम्ही बजेटमध्ये उत्तम फीचर्ससह फक्त डे-टू-डे वापरासाठी फोन शोधत असाल तर Narzo 80x 5G देखील तुमच्या गरजा पूर्ण करेल.

Realme ने या नव्या Narzo 80 सिरीजच्या माध्यमातून बजेट आणि मिड-रेंज सेगमेंटमध्ये स्पर्धेला नवी दिशा दिली असून, ग्राहकांना निवड करताना चांगले पर्याय मिळतील, यात शंका नाही.

हे पण वाचा ..iPhone 16e vs iPhone 16: कोणता iPhone घ्यावा? चला जाणून घेवू संपूर्ण माहिती!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *