rasika wakharakar actress engagement photos : मराठी मनोरंजनविश्वातून सध्या एक आनंदाची बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रसिका वखारकर हिने आपल्या आयुष्यातील खास क्षणाची घोषणा केली आहे. रसिकाचा साखरपुडा नुकताच पार पडला असून तिने सोशल मीडियावर याचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून रसिकाच्या पोस्टमुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा रंगू लागल्या होत्या. काही दिवसांपूर्वी तिने एका खास व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करत “Love in the Air” अशी कॅप्शन दिली होती. त्या वेळी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती की, हा व्यक्ती नक्की कोण आहे? मात्र, तिने चेहरा उघड न केल्याने गुढ कायम राहिलं.
आता या सर्व चर्चांना पूर्णविराम देत रसिकाने आपल्या जोडीदाराचा परिचय सर्वांसमोर करून दिला आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शुभांकर उंबराणी असून, दोघांचा साखरपुडा मोठ्या आनंदात पार पडला आहे. या खास क्षणी रसिकाने “माझ्या खऱ्या आयुष्यातला प्लस वन” असं म्हणत शुभांकरसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
रसिकाच्या या खास पोस्टवर चाहत्यांसह सहकलाकारांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुयश टिळक, ऋतुजा बागवे, योगिता चव्हाण, सानिया चौधरी, सीमा घोगळे, शुभवी गुप्ते, ऋचा गायकवाड, कांचन शिंदे यांसह अनेक कलाकारांनी रसिका आणि शुभांकरला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे पण वाचा.. डफली वाजवताना अशोक सराफ यांचा व्हिडीओ व्हायरल चाहते म्हणाले.. अशोक मामा..
दरम्यान, रसिकाच्या करिअरकडे पाहिल्यास, ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर दमदार एन्ट्री केली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. सध्या ती कलर्स मराठीवरील ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत काम करत असून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
साखरपुडा झाल्यानंतर आता रसिका आणि शुभांकरचं लग्न कधी होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्या तरी चाहत्यांसाठी हा आनंदाचा क्षण ठरला आहे कारण रसिका वखारकर हिने आपल्या जीवनातील नव्या टप्प्याची सुरुवात जाहीर केली आहे.









