ADVERTISEMENT

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या ‘फुलवंती’चा हिंदीमध्ये पहाता येणार; अॅमेझॉन प्राइमवर झाली स्ट्रीमिंगला सुरुवात

prajakta mali gashmeer Mahajani fulwanti hindi version : प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘फुलवंती’ चित्रपट मराठी प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर आता हिंदी प्रेक्षकांसाठीही उपलब्ध झाला असून अॅमेझॉन प्राइमवर या डब व्हर्जनची स्ट्रीमिंग सुरु झाली आहे.
prajakta mali gashmeer Mahajani fulwanti hindi version

prajakta mali gashmeer Mahajani fulwanti hindi version : प्राजक्ता माळी गश्मीर महाजनी (Prajakta Mali Gashmeer Mahajani) या दोन्ही लोकप्रिय कलाकारांनी साकारलेल्या ‘फुलवंती’ या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर खास छाप पाडली होती. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांकडून दाद मिळवत राहिला. आता याच चित्रपटाचा हिंदी डब केलेला आवृत्ती प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाली असून अॅमेझॉन प्राइमने त्याची स्ट्रीमिंग सुरु केली आहे.

गश्मीर महाजनीने नुकतेच शेअर केलेल्या लाइव्ह व्हिडिओमध्ये तो आणि प्राजक्ता माळी यांनी ‘फुलवंती’च्या हिंदी रिलीजची माहिती दिली. मराठी आवृत्तीला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर चित्रपट हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, हिंदी डबिंग स्वतः प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी  यांनीच केले आहे. त्यामुळे कथा आणि भावनांची नैसर्गिकता अधिक उत्तमरित्या जपली गेल्याचा दावा कलाकारांनी केला.

गश्मीर म्हणाला की, “महाराष्ट्रभरातून ‘फुलवंती’ला मिळालेलं प्रेम आम्हाला खूप मोठं आहे. आता अॅमेझॉन प्राइमवर तुम्ही हिंदी आवृत्ती पाहू शकता.” तर प्राजक्तानेही सांगितले की, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नाना पाटेकर, सचिन पिळगांवकर यांसारख्या ज्येष्ठांनी हिंदी डबिंगबाबत प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतरच ही कल्पना प्रत्यक्षात आली.

चित्रपटातील लावणीसह सर्व गाणी हिंदीमध्येही रेकॉर्ड करण्यात आली आहेत. त्यामुळे हिंदी भाषिक प्रेक्षकांनाही या चित्रपटाचा सांस्कृतिक रस अधिक जवळून अनुभवता येणार आहे.

‘फुलवंती’मध्ये Prajakta Mali Gashmeer Mahajani यांच्यासोबत प्रसाद ओक, वैभव मांगले, हृषीकेश जोशी, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. दमदार कथा, प्रभावी अभिनय आणि सुंदर संगीतातून हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला होता.

हे पण वाचा.. इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली मलायका अरोरा; स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवून केला चहा!

आता हिंदी आवृत्ती उपलब्ध झाल्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठी सिनेसृष्टीतील महत्त्वाचा चित्रपट अधिक मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्याची ही उत्तम संधी असल्याचे चाहते व्यक्त करत आहेत.

हे पण वाचा.. छाया कदम पुन्हा कोकणात! सरंबळच्या सातेरी जत्रेत सहभागी होत अभिनेत्रीने जपला गावाशी असलेला नात्याचा धागा

prajakta mali gashmeer Mahajani fulwanti hindi version