IPL 2025: pbks vs gt आज आमनेसामने कोण जिंकणार पहिला सामना !

pbks vs gt आजच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज नव्या जोमाने मैदानात उतरेल, तर गुजरात टायटन्स विजयाची संधी साधण्याचा प्रयत्न करणार आहे.

IPL 2025 च्या हंगामात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज pbks vs gt यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे. पंजाब किंग्जच्या नव्या कर्णधार श्रेस अय्यरसमोर हा सामना मोठ्या कसोटीचा ठरणार आहे. संघाला पहिल्या विजयासाठी प्रेरित करण्याची जबाबदारी अय्यरवर असेल, जो याआधी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी यशस्वी नेतृत्व करत आला आहे.

पंजाब किंग्जचा नवा कर्णधार

पंजाब किंग्जने 18 वर्षांत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. संघाने यापूर्वी 2014 मध्ये अंतिम फेरी गाठली होती आणि 2018 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, त्यानंतरच्या चार हंगामांत संघाने पहिल्या पाच संघांमध्येही स्थान मिळवलेले नाही. त्यामुळे, श्रेस अय्यरच्या रूपाने संघाने नवीन दिशा शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

यंदा संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाचा महान माजी कर्णधार रिकी पाँटिंगची नियुक्ती करण्यात आली आहे. अय्यर आणि पाँटिंग यांची जोडी याआधी दिल्ली कॅपिटल्ससाठी प्रभावी ठरली होती. त्यामुळे पंजाब किंग्जच्या चाहत्यांना या दोघांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

गुजरात टायटन्सचा पुनरागमनाचा निर्धार

दुसरीकडे, गुजरात टायटन्स संघ देखील नव्या उमेदीने हंगामाची सुरुवात करत आहे. 2022 मध्ये आयपीएल विजेतेपद पटकावल्यानंतर 2023 मध्ये संघ अंतिम फेरीत पराभूत झाला. मात्र, गेल्या हंगामात त्यांचा खेळ सुमार राहिला आणि ते आठव्या स्थानावर फेकले गेले. त्यामुळे, यंदा संघ नव्या जोमाने पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.

गुजरात टायटन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी युवा फलंदाज शुभमन गिलवर आहे. गिलने अलीकडेच दुबईत पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघासाठी जबरदस्त फलंदाजी केली होती. त्यामुळे, संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. संघात जोस बटलर, साई सुदर्शन, शाहरुख खान, ग्लेन फिलिप्स यांसारख्या दमदार फलंदाजांचा समावेश आहे. तसेच, रशीद खान, राहुल तेवटिया, वॉशिंग्टन सुंदर, महिपाल लोमरोर यांसारखे अष्टपैलू खेळाडू संघाच्या संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

हे पण वाचा …csk vs rcb tickets IPL 2025 तिकीट बुकिंग मार्गदर्शक सहज आणि जलद तिकिटे मिळवा!

pbks vs gt पिच आणि हवामानाचा अंदाज

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत 25 आयपीएल सामने खेळवले गेले असून त्यापैकी 15 वेळा दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे, नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

शुभमन गिलने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत 240-260 धावसंख्या होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे, प्रेक्षकांना एका मोठ्या धावसंख्येच्या सामन्याचा आनंद लुटता येईल. अहमदाबादमध्ये सध्या प्रचंड उष्णतेची लाट आहे. दुपारच्या वेळी तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत जाईल, तर संध्याकाळी सामना सुरू झाल्यानंतर ते 32-33 अंशांपर्यंत खाली येईल. पावसाची कोणतीही शक्यता नाही.

pbks vs gt संभाव्य संघ रचना आणि ड्रीम 11 संघ

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज दोन्ही संघ आजच्या सामन्यासाठी आपल्या सर्वोत्तम खेळाडूंना संधी देतील.

Gujarat Titans vs Punjab Kings – Possible XI & Dream 11
Gujarat Titans (GT) – संभाव्य 11
1. शुभमन गिल (कर्णधार)
2. जोस बटलर
3. साई सुदर्शन
4. शाहरुख खान
5. ग्लेन फिलिप्स
6. वॉशिंग्टन सुंदर
7. राहुल तेवटिया
8. रशीद खान
9. कागिसो रबाडा
10. मोहम्मद सिराज
11. प्रसिध कृष्णा
इम्पॅक्ट प्लेयर पर्याय: महिपाल लोमरोर / ईशांत शर्मा
Punjab Kings (PBKS) – संभाव्य 11
1. श्रेस अय्यर (कर्णधार)
2. प्रभसिमरन सिंग
3. प्रियांश आर्य
4. मार्कस स्टोइनिस
5. ग्लेन मॅक्सवेल
6. शशांक सिंग
7. नेहाल वढेरा / सूर्यांश शेडगे
8. मार्को जॅन्सन
9. हरप्रीत ब्रार
10. लॉकी फर्ग्युसन
11. अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेयर पर्याय: युजवेंद्र चहल / विष्णु विनोद
Dream 11 संघ
यष्टिरक्षकजोस बटलर, प्रभसिमरन सिंग
फलंदाजशुभमन गिल (कर्णधार), श्रेस अय्यर, प्रियांश आर्य (उपकर्णधार)
अष्टपैलू खेळाडूग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅन्सन, अझमातुल्लाह ओमरझाई
गोलंदाजरशीद खान, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
बॅकअप पर्यायकागिसो रबाडा, युजवेंद्र चहल, साई सुदर्शन, मार्कस स्टोइनिस

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज – हेड टू हेड रेकॉर्ड

गुजरात टायटन्स 2022 मध्ये आयपीएलमध्ये सहभागी झाल्यापासून त्यांनी पंजाब किंग्जविरुद्ध पाच सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामन्यांमध्ये गुजरातने विजय मिळवला आहे, तर पंजाबने दोन वेळा बाजी मारली आहे. त्यामुळे आजचा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे.

श्रेस अय्यरच्या नेतृत्वावर लक्ष केंद्रित

श्रेस अय्यर हा आयपीएलमध्ये सिद्धहस्त कर्णधार आहे. 2020 मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत पोहोचवले होते, तर 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिले होते. मात्र, केकेआरने त्याला रिटेन केले नाही आणि आता तो पंजाब किंग्जसाठी नवा अध्याय सुरू करत आहे.

रिकी पाँटिंगने पंजाब किंग्जच्या नव्या टीमला “इतिहासातील सर्वोत्तम संघ” बनवण्याचे ध्येय दिले आहे. मात्र, त्यासाठी त्यांना ओपनिंग जोडीमध्ये अधिक स्थिरता निर्माण करावी लागेल. गोलंदाजी आघाडीवर अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल हे संघासाठी महत्त्वाचे अस्त्र ठरणार आहेत.

गुजरात टायटन्सला गतवर्षीचा खराब फॉर्म सुधारायचा आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ते नव्या जिद्दीने मैदानात उतरणार आहेत. संघाकडे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत आहे, त्यामुळे हा सामना अत्यंत रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.

आजचा सामना कोण जिंकेल? याकडे संपूर्ण क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे!

Written By

माझं नाव आहे गौरव चव्हाण मी youtube, facebook आणि instagram या social media platform वरती मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या देत असतो. त्याच बरोबरच instagram Reels मध्ये tech videos बनवतो.

More From Author

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *