SRH vs LSG : 300 धावांचा विक्रम होणार का? हैदराबादच्या बॅट्समन समोर लखनऊच्या बॉलरांची कसोटी
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात आज आयपीएल 2025 मधील सातवा सामना खेळला जाणार आहे. हैदराबादच्या आक्रमक फलंदाजीपुढे लखनऊच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध SRH ने 286 धावा फटकावत विक्रमी खेळी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात 300 धावांचा टप्पा गाठला जातो का? याकडे सर्वांचे लक्ष असेल. लखनऊ संघाला पहिल्या विजयासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.