ADVERTISEMENT

पद्मिनी : ९ मेपासून सुरू होणार रहस्य, भय आणि सूडाने भरलेली नवी मराठी मालिका

padmini new marathi mystery horror revenge Serial from 9 may 2026 : ग्रामीण भयकथा, रहस्य आणि लोककथांचा आधुनिक सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांसमोर आणणारी “पद्मिनी” ही AI मायक्रो ड्रामा मालिका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
padmini new marathi mystery horror revenge Serial from 9 may 2026

padmini new marathi mystery horror revenge Serial from 9 may 2026 : ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर उभी राहिलेली “पद्मिनी” ही नवीन सिनेमॅटिक AI मायक्रो ड्रामा मालिका ९ मे २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, तिच्या पहिल्याच झलकांनी सोशल मीडियावर उत्सुकता निर्माण केली आहे. भय, रहस्य, शांतता, सूड आणि न्याय यांची अनोखी सांगड घालणारी ही कथा एका अशा गावाभोवती फिरते, जिथे एका घटनेनंतर सगळंच कायमचं बदलून जातं.

अपूर्वा नेमळेकर प्रस्तुत या मालिकेची संकल्पना पारंपरिक मराठी लोककथा आणि आधुनिक सिनेमॅटिक तंत्रज्ञान यांचा संगम मानली जात आहे. त्याचं बरोबर अपूर्वा नेमळेकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे .AI आधारित मायक्रो ड्रामा या स्वरूपामुळे कमी वेळेत प्रभावी कथा मांडण्याचा प्रयत्न या मालिकेत करण्यात आला आहे. त्यामुळेच “पद्मिनी”बद्दल प्रेक्षकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झालं आहे.

कथेच्या मध्यभागी आहे एक रहस्यमय गाव आणि त्या गावातील मंदिराशी जोडलेली भयानक घटना. गावातील मंदिरातून सोनं चोरीला गेल्यानंतर काही अकल्पित घडू लागतं. त्या रात्रीनंतर गावातल्या वातावरणातच बदल जाणवू लागतो. मध्यरात्री मंदिराच्या घंटा आपोआप वाजू लागतात, मात्र त्या वेळी तिथे कोणीही नसतं. गावातील लोकांच्या मते, त्या घटनेनंतर काहीतरी अशुभ जागं झालं आहे.

विशेष म्हणजे चोरीत सामील झालेल्या लोकांचा कुठेच मागमूस लागत नाही. गावात भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि लोक सूर्यास्तानंतर घराबाहेर पडणं बंद करतात. गावात एक अलिखित नियम तयार होतो — अंधार पडल्यानंतर उंबरठा ओलांडायचा नाही. या सगळ्या घटनांमागे “पद्मिनी” नावाची एक गूढ छाया असल्याची चर्चा गावभर सुरू असते.

कथेत “पद्मिनी” ही व्यक्तिरेखा केवळ भय निर्माण करणारी नाही, तर तिच्यामागे अन्याय, वेदना आणि सूडाची खोल भावना दडलेली असल्याचं संकेतांमधून दिसून येतं. शांतपणे दूर उभं राहून सगळ्यावर नजर ठेवणारी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करते. “ती काहीच विसरलेली नाही” हा संवाद मालिकेच्या संपूर्ण वातावरणाला अधिक गडद आणि प्रभावी बनवतो.

हे पण वाचा.. अभिनेत्री शिवानी सोनार झाली भावूक; वडिलांच्या निवृत्तीनिमित्त शेअर केली खास पोस्ट

padmini new marathi mystery horror revenge Serial from 9 may 2026

ग्रामीण महाराष्ट्रातील मातीचा सुगंध, गावाकडच्या आख्यायिका आणि भयकथांचा वास्तववादी अनुभव या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पारंपरिक भुतांच्या कथांपेक्षा वेगळं आणि सिनेमॅटिक सादरीकरण असल्याने “पद्मिनी” ही मालिका मराठी मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण करू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

हे पण वाचा.. लग्नबंधनात अडकली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर; हर्षद आत्मारामसोबत नव्या आयुष्याची सुरुवात

९ मेपासून सुरू होणाऱ्या या मालिकेकडे आता मराठी प्रेक्षकांचं लक्ष लागलं असून, “पद्मिनी”ची कथा नेमकी कोणत्या रहस्याभोवती फिरते आणि त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.