१७ वर्षांची nitanshi goel ने IIFA 2025 मध्ये बेस्ट अभिनेत्री पुरस्कार पटकावला

IIFA 2025 मध्ये nitanshi goel हिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आलिया भट्ट, कतरिना कैफ यांसारख्या दिग्गजांना मागे टाकून ‘बेस्ट अभिनेत्री’ पुरस्कार जिंकला. केवळ १७ वर्षांची असलेल्या नितांशीने ‘लपाट्या लेडीज’ चित्रपटात फूल कुमारीची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकली.

भारतातील चित्रपट सृष्टीतील एक मानाचा समजला जाणारा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA) पुरस्कार सोहळा 2025 मध्ये जयपूर येथे पार पडला. यंदाच्या या सिल्व्हर जुबिली एडिशनमध्ये अनेक कलाकारांना त्यांच्या अभिनय आणि योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. परंतु सर्वाधिक चर्चेत राहिली ती होती फक्त १७ वर्षांची nitanshi goel . तिने आपले पहिल्याच चित्रपट Laapataa Ladies मधील अभिनयाने सर्वांची मने जिंकली आणि ‘बेस्ट अभिनेत्री’चा पुरस्कार आपल्या नावे केला.

नितांशी गोयल ही मूळची नोएडा, उत्तर प्रदेश येथील आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. तीने बाल कलाकार म्हणून मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. २०१५ मध्ये Miss Pantaloons Junior Fashion Icon हा किताब जिंकत तिने इंडस्ट्रीत पाऊल टाकले. त्यानंतर तिने अनेक नामांकित ब्रँडसाठी जाहिराती केल्या जसे की Biba, Amul, East Essence, Indica Hair Color इत्यादी.

केवळ नऊ वर्षांची असतानाच तिने टीव्हीवर पदार्पण केले. Naagarjuna: Ek Yoddha, Karmaphal Daata Shani, Ishqbaaz, Thapki Pyaar Ki, Daayan, आणि Peshwa Bajirao यांसारख्या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या.

लापता लेडीजमधील nitanshi goel ची फूल कुमारीची भूमिका ठरली गेम चेंजर

Laapataa Ladies या चित्रपटात नितांशीने साकारलेली फूल कुमारी ही भूमिका खूपच गाजली. किरन राव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात दोन नवविवाहित स्त्रिया त्यांच्या नवऱ्यांच्या घरी जाताना रेल्वेमध्ये अदलाबदल होतात, अशा कथानकावर आधारित हा सिनेमा आहे. नितांशीच्या अभिनयाचे समीक्षकांनी तसेच प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.

IIFA 2025 मध्ये बेस्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारताना नितांशीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिच्या स्वीकृती भाषणाने उपस्थित सर्व प्रेक्षक भावूक झाले. बॉबी देओल आणि बोमन इराणी यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नितांशीने आपल्या आई व चित्रपटाच्या टीमचे विशेष आभार मानले. “मी या पुरस्काराची अपेक्षा केली नव्हती. मी फक्त एवढेच म्हणेन की, लपाट्या लेडीज मोठे जिंकावा अशी आशा होती, पण मी स्वतः पुरस्कार जिंकेन यावर विश्वास नव्हता,” असे तिने ANI शी बोलताना सांगितले.

या पुरस्काराच्या शर्यतीत आलिया भट्ट (Jigra), कतरिना कैफ (Merry Christmas), यामी गौतम (Article 370), आणि श्रद्धा कपूर (Stree 2) होत्या. या सर्व दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकून नितांशीने तिचे पहिलेच मोठे अॅक्टिंग अवॉर्ड पटकावले.

पुरस्कार जिंकल्यानंतर नितांशीने आपल्या पुढील स्वप्नांबद्दलही सांगितले. तिने सांगितले की, “शाहरुख सर हे माझ्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत आणि त्यानंतर कार्तिक आर्यन. त्यांच्या सोबत काम करणे हे माझ्यासाठी खूपच विशेष असेल.”

IIFA 2025: लापता लेडीजने जिंकले तब्बल १० पुरस्कार

Laapataa Ladies या चित्रपटाने IIFA 2025 मध्ये मोठी बाजी मारली. या चित्रपटाने एकूण १० पुरस्कार पटकावले, ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (Kiran Rao), आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Nitanshi Goel) यांचा समावेश होता. याशिवाय रवि किशनला या चित्रपटासाठी ‘सपोर्टिंग रोल’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला.

पूर्ण पुरस्कार विजेत्यांची यादी:

Best Picture – Laapataa Ladies

Best Performance In A Leading Role (Male) – Kartik Aaryan (Bhool Bhulaiyaa 3)

Best Performance In A Leading Role (Female) – Nitanshi Goel (Laapataa Ladies)

Best Direction – Kiran Rao (Laapataa Ladies)

Best Performance In A Negative Role – Raghav Juyal (Kill)

Best Supporting Actor (Female) – Janki Bodiwala (Shaitaan)

Best Supporting Actor (Male) – Ravi Kishan (Laapataa Ladies)

Best Story (Original) – Biplab Goswami (Laapataa Ladies)

Best Debut (Female) – Pratibha Ranta (Laapataa Ladies)

हे पण वाचा..Sairat Movie ‘सैराट’ पुन्हा मोठ्या पडद्यावर – आर्ची-परश्या प्रेक्षकांना पुन्हा वेड लावणार!

करेना कपूरने दिला राज कपूर यांना मानाचा मुजरा

IIFA 2025 च्या अंतिम रात्री करीना कपूरने आपल्या आजोबा राज कपूर यांच्या गाण्यांवर नृत्य सादर केले. ‘मेरा जूता है जापानी’, ‘प्यार हुआ इकरार हुआ’ यांसारख्या गाण्यांवर तिने अप्रतिम परफॉर्मन्स दिला. IIFA च्या अधिकृत इंस्टाग्रामवर याचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे. “राज कपूर यांना वाहिलेली ही श्रद्धांजली पाहून मन भारावून गेले,” असे एका फॅनने म्हटले आहे.

Nitanshi Goel : बनलेली सर्वात तरुण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर

Nitanshi Goel ही केवळ अभिनेत्री नाही, तर ती एक प्रशिक्षित कथक डान्सर आणि गायिका देखील आहे. सध्या तिच्या इन्स्टाग्रामवर ११ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत, ज्यामुळे ती भारतातील सर्वात तरुण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मानली जाते.

IIFA 2025 पुरस्कार सोहळ्याची ठळक वैशिष्ट्ये:

शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करीना कपूर यांचे आकर्षक परफॉर्मन्स

शाहिद कपूर आणि करीना कपूरचा मंचावर एकत्र येणे आणि हृदयस्पर्शी क्षण

Laapataa Ladies चा सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अनेक पुरस्कारांवर कब्जा

IIFA Awards 2025 हा पुरस्कार सोहळा नितांशी गोयलच्या नावाने गाजला. केवळ १७ वर्षांची असलेली ही अभिनेत्री पुढील काळात बॉलिवूडमधील एक मोठे नाव होणार, याबाबत कोणतीच शंका नाही. तिच्या अभिनयाची जादू आणि प्रामाणिक प्रयत्न हे यशाचे मुख्य कारण ठरले. तसेच Laapataa Ladies सारख्या सामाजिक वास्तवावर आधारित चित्रपटांनी सुद्धा यंदाच्या पुरस्कारांमध्ये बाजी मारली.

हे पण वाचा..emraan hashmi awarapan पुन्हा रिलीज – चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

Written By

माझं नाव आहे गौरव चव्हाण मी youtube, facebook आणि instagram या social media platform वरती मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या देत असतो. त्याच बरोबरच instagram Reels मध्ये tech videos बनवतो.

More From Author

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *