मोबाईल वापरताना अनेकदा सिग्नल नेटवर्क नसल्यामुळे अडचणी येतात. कॉल करायचा असतो, इंटरनेट वापरायचं असतं, पण नेटवर्कच येत नाही. ही समस्या अनेकदा बंदिस्त इमारती तसेच ग्रामीण भागात जास्त जाणवते. मात्र, आता Airtel, Jio आणि BSNL युजर्ससाठी मोठी सुविधा सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे नेटवर्क नसतानाही फोन कॉल आणि इंटरनेटचा वापर करता येणार आहे.
आज मी या आर्टिकल मध्ये तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे.
Table of Contents
कसं शक्य आहे? नेटवर्क नसतानाही कॉल आणि इंटरनेट?
डिजिटल भारत निधी (DBN) अंतर्गत भारत सरकारने इंट्रा सर्कल रोमिंग (ICR) सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या मदतीने तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या कोणत्याही कंपनीच्या सिम कार्डला सिग्नल येत नसेल, तिथे दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कचा उपयोग करून कॉल आणि इंटरनेटचा वापरू शकता. म्हणजे, जर तुम्ही Jio वापरत असाल आणि त्या भागात Jio चं नेटवर्क नसेल, पण BSNL किंवा Airtel चं नेटवर्क असेल, तर तुमचा फोन आपोआप त्या नेटवर्कला कनेक्ट होईल आणि तुम्ही कॉल करू शकाल, तसंच तुमचं इंटरनेटही चालू राहील.
हा बदल देशातील लाखो युजर्ससाठी क्रांतिकारी ठरणार आहे. विशेषतः ग्रामीण भागात, जिथे नेटवर्कच्या समस्या जास्त जाणवतात, तिथे याचा खूप मोठा फायदा होईल.
ग्रामीण भागातील युजर्सना सर्वाधिक फायदा
शहरी भागात अनेकदा नेटवर्क उत्तम असते कारण शहरात मोठ्या प्रमाणामध्ये सिग्नल टावर्स बसवलेले असतात, पण ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात सिग्नलच्या अडचणी येत आहेत. काही ठिकाणी BSNL चं नेटवर्क चांगलं आहे, तर काही ठिकाणी Jio किंवा Airtel चं चांगलं नेटवर्क आहे. अशावेळी तुम्ही कोणत्याही एका कंपनीचा युजर असाल, पण त्या ठिकाणी दुसऱ्या कंपनीचा टॉवर असेल, तरीही आता तुमचा मोबाईल त्या टॉवरचं नेटवर्क घेऊन तुम्हाला नेटवर्क प्रोव्हाइड करेल.
हा बदल 4G सेवा पुरवणाऱ्या ऑपरेटर्ससाठीही मोठा टप्पा आहे. आता BSNL, Jio आणि Airtel हे सर्व जण एकमेकांच्या नेटवर्कचा वापर करू शकतील, ज्यामुळे महाराष्ट्र तसेच भारतातील बऱ्याच ग्रामीण भागांमध्ये नेटवर्कच्या समस्या आता दूर होतील.

ही सेवा कशी वापरता येईल?
यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये, जर तुमच्याकडे Airtel, jio किंवा BSNL चं सिमकार्ड असेल आणि तुमच्या भागात जर नेटवर्कची समस्या असेल, तर फोन आपोआप उपलब्ध असलेल्या तिन्ही पैकी कोणत्याही कंपनीच्या टॉवरच्या नेटवर्कला कनेक्ट होईल.
तुम्हाला कोणताही ॲप डाउनलोड करण्याची किंवा वेगळे सेटिंग्ज बदलण्याची गरज नाही. ही सेवा पूर्णपणे ऑटोमॅटिक असेल आणि सरकारच्या डिजिटल भारत योजनेअंतर्गत ती राबवली जात आहे.
याचा सर्वाधिक उपयोग कोणाला होईल?
1. ग्रामीण भागातील नागरिक – जिथे नेटवर्कची समस्या वारंवार जाणवतात.
2. ट्रेकिंग आणि दुर्गम भागात प्रवास करणारे लोक – जिथे नेटवर्क पोहोचत नाही, अशा ठिकाणी प्रवास करणाऱ्यांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल.
3. आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन सेवा – आपत्तीच्या वेळी नेटवर्क उपलब्ध नसणे ही मोठी समस्या असते, पण आता हा अडथळा दूर होईल.
4. व्यवसायिक आणि प्रवासी – सतत वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ही सुविधा खूप फायदेशीर ठरणार आहे.
हे पण वाचा..दमदार बॅटरी आणि अनेक AI फिचर्ससह सुसज्ज Vivo V50 लॉन्च झाला आहे जाणून घ्या किंमत!
नवीन तंत्रज्ञानामुळे मोबाईल युजर्सला मोठा दिलासा
यापूर्वी नेटवर्क नसलं की फोन पूर्णपणे बंद झाल्यासारखाच असायचा, कुणालाही साधा कॉल करता येत नाही, इंटरनेट तर लांबची गोष्ट आहे. पण आता हे चित्र बदलणार आहे. नेटवर्क नसलं तरीही तुम्ही दुसऱ्या टेलिकॉम कंपनीच्या टॉवरचा वापर करून कॉल आणि इंटरनेट वापरू शकणार आहात.
ही सेवा सुरू झाल्यानंतर भारतातील मोबाईल नेटवर्कच्या तंत्रज्ञानात मोठा बदल होईल. भविष्यात 5G आणि त्यापुढील सेवांसाठीही अशीच सोय लागू शकते. त्यामुळे, आता तुम्ही कोणत्याही नेटवर्कचा वापर करत असलात तरी, तुम्हाला कधीही “No Signal” ही अडचण येणार नाही अशीच आपण अपेक्षा ठेवू शकतो.
तर आशा आहे की तुम्हाला या आर्टिकल मधून खूप महत्त्वाची माहिती मिळालेली असेल धन्यवाद.









