ADVERTISEMENT

नवरात्रीत नऊ रंगांचा वेगळा अर्थ सांगणारा कुशल बद्रिकेचा व्हिडीओ चर्चेत

navratri nau ranganvar kushal badrikecha video : लोकप्रिय अभिनेता Kushal Badrike ने नवरात्रीच्या नऊ रंगांबाबत आपली खास भूमिका मांडत एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. “रंग बदलणारी माणसं आणि सरडे नवरात्रीत उपयोगी पडत नाहीत”, अशा भन्नाट शैलीत केलेली त्याची मांडणी सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.
navratri nau ranganvar kushal badrikecha video

navratri nau ranganvar kushal badrikecha video : नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली की भक्ती, आनंद आणि उत्साहाचं वातावरण प्रत्येक ठिकाणी दिसून येतं. या दिवसांत स्त्रिया नऊ रंगातील पेहराव परिधान करून देवीची आराधना करतात. अनेक अभिनेत्री दररोज या रंगांशी सुसंगत साड्या व ड्रेस परिधान करत आपले फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र, या पारंपरिक रंगांच्या मागचं तत्त्वज्ञान थोडं वेगळ्या ढंगात उलगडून दाखवलं आहे लोकप्रिय अभिनेते कुशल बद्रिके यांनी.

‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारा कुशल सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय आहे. त्याच्या विनोदी पोस्ट्स, हटके कॅप्शन्स आणि व्हिडीओज नेहमी चर्चेत राहतात. नवरात्रीनिमित्त त्याने टाकलेला नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.

या व्हिडीओमध्ये Kushal Badrike विनोदी शैलीत म्हणतो, “नऊ रंग आणि नवरात्री यांचा विचार करताना मला काही गोष्टी सुचल्या. रंग बदलणारी माणसं जगात आहेत, पण त्यांचा उपयोग नवरात्रीत होत नाही. सरडे रंग बदलतात, पण त्यांनाही नवरात्र साजरी करता येत नाही.” या उपरोधिक शैलीने त्याने चाहत्यांना हसवतानाच विचार करायलाही भाग पाडलं आहे.

कुशल पुढे सांगतो, “होळीत आपण अंगावर वेगवेगळे रंग चढवतो, पण नवरात्रीत कपड्यांमधून रंग आपल्या जीवनात आणतो. सुरेश भटांच्या ‘रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ या गाण्यात ज्या रंगाची चर्चा होते, तो रंग दाखवण्याचा नाही, तर मनापासून अनुभवण्याचा आहे. कदाचित म्हणूनच हे गाणं गरब्यात वाजत नाही.”

यासोबतच त्याने नवरात्रोत्सवाचं एक वैशिष्ट्य अधोरेखित केलं. “उत्तर प्रदेशात सुरू झालेली कृष्णाची रासलीला गुजरातमध्ये संतोषी मातेच्या आराधनेत गुंफली जाते आणि महाराष्ट्रात हा सण अनोख्या उत्साहात साजरा होतो. त्यामुळे या सणाला जाती-पातीचा रंग चढत नाही, उलट ‘माणूस म्हणून जगण्याची रंगत’ वाढते.” अशा शब्दांत Kushal Badrike ने या उत्सवाची खरी मजा व्यक्त केली.

हे पण वाचा.. अमृता खानविलकर हिचा फिटनेस मंत्र; PCOD वर मात करत उपवासामुळे मिळालं निरोगी आयुष्य”

कुशलने शेवटी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देत व्हिडीओ संपवला. चाहत्यांनी त्याच्या या भन्नाट मांडणीचं कौतुक करत, “नेहमीप्रमाणे मजेदार आणि विचार करायला लावणारं” अशा प्रतिक्रिया दिल्या.

सध्या कुशल ‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या पर्वातून प्रेक्षकांसमोर आहे. श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव यांच्यासोबत त्याची जोडी पुन्हा एकदा रंगतदार ठरत आहे; तर शोचं सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर करत आहे.

हे पण वाचा.. ‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकरचा ऑनस्क्रीन नवऱ्याबद्दल खुलासा; म्हणाली – ‘हा तर खूप साधा भोळा आहे’ laxmi nivas

navratri nau ranganvar kushal badrikecha video