Nashibvaan Upcoming Twist for Rudrapratap and Girija : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका नशिबवान(Nashibvaan) सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवत असून प्रत्येक भागात नवीन वळणांची भर पडताना दिसत आहे. आदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक यांच्या दमदार अभिनयामुळे सुरूवातीपासूनच ही कथा लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. १५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही मालिका आता अशा टप्प्यावर पोहोचली आहे, जिथे रुद्रप्रताप आणि गिरीजाच्या नात्यातील भावना जोर धरू लागल्या आहेत. दोघांचा साखरपुडा जवळ आल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात आहे. मात्र या आनंदातच एक नवं वादळ येणार असल्याचं संकेत नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहेत.
सोशल मीडियावर शेअर झालेल्या नवीन प्रोमोमध्ये रुद्रप्रताप–गिरीजाच्या साखरपुड्याचा महत्त्वाचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. परंतु या क्षणातच एका नवीन पात्राची एंट्री होताना दिसते, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेत प्रवेश करणारी ही अभिनेत्री म्हणजे सानिका मोजार. “शेवटी जे ज्याचं आहे ते त्यालाच मिळणार…” अशा उत्सुकता वाढवणाऱ्या कॅप्शनसह हा प्रोमो स्टार प्रवाहच्या अधिकृत पेजवर प्रदर्शित करण्यात आला. प्रोमो पाहताच मालिकेचे चाहते आगामी भागात काय घडणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सानिका मोजार ही मराठी टेलिव्हिजनमधील ओळखीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. लय आवडतेस तू मला मालिकेतल्या भूमिकेमुळे तिने प्रेक्षकांचे भरभरून कौतुक मिळवले आहे. आता नशिबवान मध्ये तिचा प्रवेश झाल्यानंतर कथानक कोणत्या दिशेने वळणार याबद्दल अनेक अटकळी रंगू लागल्या आहेत. रुद्रप्रताप आणि गिरीजा यांच्या नात्यात ही व्यक्तिरेखा अडथळा ठरणार का? की तिच्या आगमनामुळे एखादं गुपित उलगडणार? याबाबत प्रेक्षकांचं कुतूहल शिगेला पोहोचलं आहे.
हे पण वाचा.. वल्लरी विराजची नवी मालिका येतेय! झी मराठीवर तिच्यासोबत कोणता हिरो दिसणार?
Nashibvaan चाहत्यांसाठी येणारे काही भाग अधिकच रोमहर्षक ठरणार आहेत. प्रेम, राजकारण आणि नात्यातील गुंतागुंत अशा सर्वच घटकांची रंगतदार सांगड या मालिकेने घातली आहे. आता या नव्या पात्रामुळे रुद्रप्रताप–गिरीजाच्या बंधनात नेमकं काय बदलणार, हे पाहणं नक्कीच मनोरंजक ठरणार आहे.
हे पण वाचा.. थँक्यू नाही, आता आय लव यू! तू ही रे माझा मितवा मालिकेत ईश्वरी अर्णवकडे व्यक्त करणार मनातील प्रेम









