‘Lagna Nantar Hoilach Prem’ ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका सध्या अतिशय नाट्यमय वळणावर पोहोचली आहे. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करणाऱ्या पिहूच्या मानसिक स्थितीचं गूढ उलगडण्याच्या वाटेवर नंदिनीचा प्रवास सुरू असून, अखेर सगळं सत्य समोर येण्याची वेळ जवळ आली आहे.
मालिकेतील आगामी भागात नंदिनी थेट वसु आत्याला जाब विचारताना दिसणार असून, त्यांच्या कटकारस्थानाचं पडदाफाश होणार आहे. लग्नमंडपात नंदिनीचं अपहरण करण्यामागे वसु आत्यांचा डाव होता, हे सत्य पिहूच्या कानावर आलं होतं. मात्र, हे ऐकून तिच्या मनावर खोल परिणाम झाला आणि ती पूर्णपणे मानसिकदृष्ट्या अस्थिर झाली.
नंदिनीला पिहूच्या अवस्थेबाबत प्रचंड काळजी वाटते आणि ती तिच्या मदतीसाठी एक मानसिक समुपदेशक घरी बोलावते. नंदिनीचा हा निर्णय वसु आत्याला आणि रम्याला घाबरवणारा ठरतो कारण आता त्यांच्या कारस्थानांचा भांडाफोड होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हे सत्य लपवण्यासाठी त्या मंजूच्या मनात नंदिनीविरोधात विष पेरतात.
वसु आत्यांच्या या कारस्थानामुळे मंजू प्रचंड संतापते आणि नंदिनीवर आरोप करते की, “तूच मुद्दाम हे सगळं करतेस.” पण नंदिनी त्याहूनही हुशार ठरते. ती जाणते की मंजूच्या डोक्यात हे सर्व भरवलं गेलंय आणि आता तिला खरं समजवण्यासाठी वेळ येतो. Lagna Nantar Hoilach Prem today episode,
दरम्यान, पिहूची प्रकृती आता सुधारते आणि तिच्याकडून नंदिनीला वसु आत्यांविरोधात एक मोठा पुरावा मिळतो. हा पुरावा नंदिनीला इतका धक्का देतो की ती थेट घरातल्या सगळ्यांसमोर वसु आत्याला जाब विचारते.
नंदिनीचा रोखठोक सवाल, “शत्रू जर घरातलाच निघाला तर काय करायचं?” हे बोलतानाच तिच्या डोळ्यातील अश्रू आणि संताप प्रेक्षकांच्या मनाला चटका लावणारे ठरतात. ती पुढे म्हणते, “तुम्ही आम्हा चौघांचं आयुष्य उध्वस्त केलंत, दीपकाशी संगनमत करून माझं अपहरण केलंत… हे सगळं केवळ तुमचं कारस्थान होतं.”
या स्फोटक खुलास्यानंतर घरात एकच खळबळ उडते. मानिनी, विक्रम आणि इतर सगळ्यांना या प्रकाराचा धक्का बसतो. वसु आत्याही स्वतः हादरून जातात. ११ ऑगस्टच्या भागात हे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, तो एक निर्णायक क्षण असणार आहे.
सध्या या प्रोमोवर सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही युजर्स म्हणतात, “हे फक्त स्वप्न नको असेल आणि नंदिनीने खरंच तिच्यावर अन्याय करणाऱ्यांना जाब दिला पाहिजे.” अनेकांनी या प्रोमोलाच मालिकेचं टर्निंग पॉईंट म्हटलं आहे.
तर, आता हे दृश्य नुसतं स्वप्न आहे की खरंच, याचा खुलासा येत्या ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता ‘Lagna Nantar Hoilach Prem’ मालिकेत होणार आहे.









